फोटो सौजन्य: iStock
उन्हाळा येताच, जवळजवळ प्रत्येकजण स्वतःची विशेष काळजी घेत असतो जेणेकरून उन्हामुळे किंवा उष्माघातामुळे त्यांचे आरोग्य बिघडले जाऊ नये. त्याचप्रमाणे, उन्हाळ्यात बाईकची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या शरीराप्रमाणेच, तुमच्या बाईकवर सूर्यप्रकाशाचा नकारात्मक परिणाम होत असतो. जर तुमची बाईक अति उष्णतेमध्ये बिघडली तर तुम्हाला याचा आणखी त्रास होऊ शकतो. म्हणूनच काही सोप्या टिप्स बाईक रायडरला ठाऊक असणे फार गरजेचे आहे. चला, उन्हाळ्यात बाईकची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात, बाईकचे इंजिन इतर ऋतूंपेक्षा जास्त गरम होते. त्याच वेळी, जर इंजिन ऑइलची क्वालिटी चांगली नसेल किंवा त्याचे प्रमाण कमी असेल तर उष्णतेमुळे इंजिनमध्ये जास्त घर्षण होऊ शकते. यामुळे, इंजिनवर नको तो परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे बाईक धावताना अचानक बंद पडू शकते. म्हणून, उन्हाळ्यात इंजिन ऑइल नियमितपणे तपासात चला.
उन्हाळ्यात टायर्सचे तापमान वाढते. जर टायर्समध्ये हवेचा दाब खूप जास्त किंवा खूप कमी असेल तर बाईकची स्थिती बिघडू शकते. म्हणून, वेळोवेळी टायर्स तपासा आणि त्यांचा दाब योग्य ठेवा. जर टायरमध्ये काही कट किंवा क्रॅक असेल तर ते बदलून घ्या, अन्यथा बाईक चालवताना ते अचानक फुटू शकते. ज्यामुळे तुम्हाला दुखापत देखील होऊ शकते.
उन्हाळ्यामुळे बॅटरी लवकर गरम होऊ शकते, ज्यामुळे बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, बाईकचे बॅटरी टर्मिनल्स योग्यरित्या स्वच्छ आणि साफ करा व बॅटरी कनेक्शन योग्य आहे का याची खात्री करा. बॅटरीमध्ये काही समस्या असल्यास, ती वेळेवर बदलून घ्या.
उन्हाळ्यात खूप धूळ आणि घाण उडते, ज्यामुळे एअर फिल्टर लवकर घाण होऊ शकतो. घाणेरड्या एअर फिल्टरमुळे इंजिनला योग्य हवा मिळत नाही, परिणामी बाईकच्या इंजिनमध्ये योग्य प्रमाणात हवा जात नाही. यामुळे इंजिन व्यवस्थित काम नाही करत आणि ते बंद पडण्याची शक्यता देखील वाढते. म्हणून, एअर फिल्टर वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे.
Bullet 350 की Hunter 350, रॉयल एन्फिल्डची कोणती बाईक देते जास्त मायलेज?
उन्हाळ्यात बाईकच्या ब्रेकवर परिणाम होतो. उन्हाळ्यात, हिवाळ्यापेक्षा ब्रेकवर जास्त दाब असतो आणि जर ब्रेकमध्ये काही समस्या असल्यास तुम्ही अपघाताला बळी ठरू शकतात. म्हणून, बाईकचे टायर वेळोवेळी तपासले पाहिजेत आणि गरज पडल्यास ते बदलले देखील गेले पाहिजेत.