'हे' आहेत 70,000 रुपयांच्या बजेटमध्ये एकदम टकाटक स्कूटर
जेव्हापासून GST च्या दरांमध्ये कपात झाली आहे, तेव्हापासून भारतीय बाजारात दुचाकींच्या मागणीत चांगलीच वाढ पाहायला मिळाली आहे. खासकरून स्कूटरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यात आता दिवाळी आल्यामुळे बजेट फ्रेंडली स्कूटरच्या विक्रीत अजूनच वाढ होणार यात काही वाद नाही.
भारतीय बाजारात असे अनेक स्कूटर्स उपलब्ध आहेत, जे केवळ किफायतशीरच नाहीत तर उत्तम मायलेजही देतात. जर तुमचं बजेट सुमारे 70,000 रुपयांच्या आसपास आहे आणि तुम्ही एक विश्वासार्ह स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या प्राईस रेंजमध्ये अनेक स्कूटर्स उपलब्ध आहेत, जे फीचर्स, मायलेज आणि परफॉर्मन्सच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत.
Diwali 2025 मध्ये ‘या’ Scooters चाच बोलबाला, किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी
तुमच्यासाठी पहिला पर्याय म्हणजे Honda Activa 6G, ज्याची एक्स-शोरूम किंमत 74,369 पासून सुरू होते. यात 109.51cc इंजिन दिले आहे, जे 59.5 kmpl इतके मायलेज देते. या स्कूटरची टॉप स्पीड 85 kmph आहे. भारतीय बाजारात Honda Activa ही सर्वात विश्वासार्ह आणि सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर मानली जाते. याची बिल्ट क्वालिटी आणि कमी मेंटेनन्स खर्चामुळे ती एक परफेक्ट फॅमिली स्कूटर बनते. तसेच कित्येक वर्षांपासून ही स्कूटर ग्राहकांची लोकप्रिय स्कूटर बनली आहे.
दुसरा पर्याय म्हणजे TVS Jupiter, ज्याची एक्स-शोरूम किंमत 75,600 रुपयांपासून सुरू होते. यात 113.3cc इंजिन असून हे 48 kmpl मायलेज देते. याची टॉप स्पीड 82 kmph आहे. हा स्कूटर मजबूत ग्रिप, स्मूद राइड आणि उत्कृष्ट ग्राउंड क्लिअरन्ससाठी ओळखला जातो, ज्यामुळे ती रोजच्या प्रवासासाठी आदर्श ठरतो.
Suzuki Access 125 ची एक्स-शोरूम किंमत 77,284 रुपयांपासून सुरू होते. यात 124cc इंजिन असून ते 8.42 PS पॉवर आणि सुमारे 45 kmpl मायलेज देते. हा स्कूटर त्या ग्राहकांसाठी योग्य आहे जे अधिक पॉवर, आकर्षक डिझाइन आणि परफॉर्मन्स यांचा उत्तम समन्वय शोधत आहेत.
World Most Expensive Car: आयुष्याची सगळी जमापुंजी दिलीत तरी सुद्धा ‘ही’ कार खरेदी करता येणार नाही!
Yamaha Fascino 125 ची एक्स-शोरूम किंमत 74,044 रुपयांपासून सुरू होते. यात 125cc इंजिन आहे, जे 68.75 kmpl मायलेज आणि 90 kmph टॉप स्पीड देते. हा स्कूटर विशेषतः तरुण रायडर्स लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. त्याचा हायब्रिड टेक्नॉलॉजीसह स्टायलिश डिझाइन आणि प्रभावी मायलेज हे त्याला एक स्मार्ट पर्याय बनवतात. हे सर्व स्कूटर्स 1 लाखांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत.