फोटो सौजन्य: iStock
मे आणि जून हे देशात सर्वाधिक उष्णतेचे महिने मानले जातात. या काळात उन्हाची तीव्रता एवढी वाढते की बाहेर पडणेही कठीण होते. विशेषतः कारमधून प्रवास करताना AC शिवाय प्रवास करणं जवळपास अशक्यच ठरतं. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात देखील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून थंडाव्यासाठी AC चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मग तो घरगुती AC असो किंवा कारमधील, एसीशिवाय राहताच येत नाही. मात्र, अनेकांना वाटतं की कारमधील AC चालू ठेवला की मायलेज कमी होतं. अशावेळी योग्य वेग राखल्यास AC वापरूनही इंधनाचा अपव्यय टाळता येतो.
अनेकदा कार मधील एसीचा वापर हा मायलेजवर परिणाम करत असतो. त्यामुळेच जर तुम्हाला उन्हाळ्यात कार चालवताना एसी वापरायचे असेल आणि मायलेजमध्ये कोणतीही घट नको असेल, तर चांगले मायलेज मिळविण्यासाठी तुम्ही तुमची कार कोणत्या स्पीडवर चालवावी, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
फक्त भारतात नाही तर जगभरात EVs चा डंका ! येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या कार नाहीसे होणार?
उन्हाळ्यात एसीशिवाय कारमधून प्रवास करणे कठीण होते. त्यात आता उष्णतेपासून आराम फक्त एसी चालवूनच मिळू शकतो. कारमध्ये एसी चालवल्याने मायलेज 5 ते 20 टक्क्यांनी कमी होते. ज्यामुळे पेट्रोल वारंवार भरावे लागते. परिणामी आपला खर्च वाढतो.
उन्हाळ्यात जेव्हा जेव्हा एसी कारच्या आत चालवला जातो तेव्हा त्याला वीज पुरवण्यासाठी कंप्रेसरला जास्त मेहनत घ्यावी लागते. कारमधील कंप्रेसरला पॉवर देण्यासाठी, इंजिनला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागते आणि या प्रक्रियेचा मायलेजवर परिणाम होतो.
जर तुम्हाला कारमधील एसी चालवायचा आहे आणि मायलेज देखील सुधारायचा असेल तर तुम्हाला कारच्या स्पीडकडे लक्ष द्या. सामान्यतः लोकांना रिकामा रस्ता दिसला की ते लगेच स्पीड वाढवतात, जी एक वाईट सवय आहे. यापेक्षा, जर कार शहरांमध्ये 50 ते 60 Km/hr आणि महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर 100 च्या आसपास वेगाने चालवली तर ते मायलेज सुधारण्याची शक्यता वाढते.
मार्केटमध्ये एकापेक्षा एक अशा 4 सरस Adventure Bikes होणार लाँच, ‘हे’ आहेत खास वैशिष्ट्य
याशिवाय, कारमधील एसीचा थंड होण्याचा परिणाम फॅनच्या स्पीडवर देखील अवलंबून असतो. फॅनचा वेग चार किंवा पाच ठेवला तरी कंप्रेसरला जास्त काम करावे लागते आणि परिणामी कारचा मायलेज कमी होते. त्याऐवजी, जर तुम्ही एसी चालू केला आणि एक किंवा दोन फॅन चालू ठेवले तर कार चांगली थंड होते आणि त्याचा मायलेजवर देखील कोणताही वाईट परिणाम होत नाही.