फोटो सौजन्य: Pinterest
फोक्सवॅगन भारतात त्यांची नवीन प्रीमियम 7-सीटर एसयूव्ही, SUV Tayron R-Line लाँच करण्याची तयारी करत आहे. ही एसयूव्ही 2026 च्या पहिल्या तिमाहीत भारतीय बाजारात लाँच केली जाईल. लाँच झाल्यानंतर, टायरॉन आर-लाइन भारतात फोक्सवॅगनची प्रमुख एसयूव्ही बनेल. कंपनी ही कार अशा ग्राहकांसाठी सादर करत आहे जे Toyota Fortuner आणि MG Gloster सारख्या मोठ्या, अधिक आलिशान आणि अधिक शक्तिशाली 7-सीटर एसयूव्हीच्या शोधात आहेत.
Autocar Awards 2026 मध्ये ‘या’ कंपन्यांचा डंका! ‘ही’ SUV ठरली कार ऑफ दि इयर
Tayron ची एंट्री हे स्पष्ट करते की कंपनी भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखत आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन Volkswagen ही SUV लोकली असेंबल करण्याच्या तयारीत असून, त्यामुळे किंमत अधिक स्पर्धात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. Tayron R-Line मध्ये कुटुंबासाठी भरपूर स्पेस आणि उत्तम कम्फर्ट मिळेल, तसेच R-Line पॅकेजमुळे या SUV ला स्पोर्टी टचही लाभेल.
Volkswagen Tayron R-Line चा लुक मजबूत आणि प्रीमियम असेल. फ्रंटला संपूर्ण रुंदीभर पसरलेली LED लाईट स्ट्रिप देण्यात आली असून, ती दोन्ही हेडलॅम्प्सना जोडते. याच्या मध्यभागी लाईटेड VW लोगो असून, त्यामुळे SUV ला वेगळी ओळख मिळते. मागील बाजूस कनेक्टेड LED टेललॅम्प्स आणि लाईटेड VW लोगो देण्यात आला आहे. ग्लोबल मॉडेलमध्ये 17-इंच अलॉय व्हील्स मिळतात; मात्र भारतात येणाऱ्या व्हर्जनमध्ये 19-इंच मोठे अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता असून, यामुळे रोड प्रेझेन्स अधिकच दमदार दिसेल.
Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा
भारतात Volkswagen Tayron R-Line ला 2.0-लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सादर केले जाऊ शकते. हे इंजिन दमदार परफॉर्मन्स आणि स्मूथ ड्रायव्हिंगसाठी ओळखले जाते. किमतीबाबत बोलायचे झाल्यास, याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 49 ते 50 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही SUV थेट Toyota Fortuner आणि MG Gloster ला टक्कर देईल.






