फोटो सौजन्य: @carandbike/X.com
भारतात ज्याप्रमाणे बाईकच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे स्कूटरच्या विक्रीत सुद्धा वाढ होत आहे. मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली स्कूटरला चांगली मागणी मिळत आहे. यासोबतच प्रिमीयम स्कूटर सेगमेंटमध्ये सुद्धा स्कूटरला चांगली मागणी मिळत आहे. म्हणूनच तर अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये आकर्षक लूक असणाऱ्या स्कूटर ऑफर करत असतात. आता टीव्हीएस ही आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी सुद्धा एक नवीन प्रीमियम स्कूटर लाँच करणार आहे. टीव्हीएस हा नवीन स्कूटर कधी आणि कोणत्या सेगमेंटमध्ये लाँच करण्याची योजना आखत आहे. त्याची अपेक्षित किंमत काय असू शकते. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Tata Altroz Facelift बेस व्हेरिएंट तुमच्या दारात उभी, किती असेल EMI?
लवकरच टीव्हीएस भारतात आणखी एक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. ही स्कूटर उत्पादक कंपनी प्रीमियम सेगमेंटमध्ये एका नवीन स्कूटर लाँच करणार आहे. माहितीनुसार, टीव्हीएस एनटॉर्क 150 भारतात 4 सप्टेंबर 2025 रोजी अधिकृतपणे लाँच होणार आहे.
स्कूटरच्या इंजिन आणि फीचर्सबद्दलची अचूक माहिती आणि त्याची किंमत लाँच करताना दिली जाईल. परंतु अशी अपेक्षा आहे की त्यात 150 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले जाईल. यासोबतच, क्वाड एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाईट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोठ्या अलॉय व्हील्ससह 14 इंच चाके, एबीएस, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सिस्टम, इंजिन स्टार्ट/स्टॉप, हॅझार्ड लाईट्स असे अनेक उत्तम फीचर्स त्यात दिले जाऊ शकतात.
टीव्हीएस एन टॉर्क 150 ची किंमत त्याच्या लाँचिंगच्या वेळी अचूक सांगेल. परंतु अशी अपेक्षा आहे की त्याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 1.45 लाख ते 1.50 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.
TVS Raider च्या नवीन लूक समोर भल्याभल्या बाईक फिक्या, Marvel लव्हर्ससाठी तर पर्वणीच
कंपनी 150 सीसी सेगमेंटमध्ये एक नवीन स्कूटर लाँच करेल. ही स्कूटर बाजारात Yamaha Aerox 155, Hero Xoom 160 सारख्या स्कूटरशी थेट स्पर्धा करेल.