फोटो सौजन्य: iStock
देशात ज्याप्रमाणे कारची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे, त्याचप्रमाणे बाईक्सची विक्री देखील झपाट्याने वाढताना दिसत आहे. यातही पूर्वीचे ग्राहक बाईक खरेदी करताना फक्त किंमत आणि मायलेज या दोनच गोष्टींकडे लक्ष द्यायचे. पण आता ही स्थती बदलली आहे. आजचा ग्राहक बाईक खरेदी करताना तिचा लूक आणि डिझाइनवर देखील लक्षकेंद्रित करतो.
आज मार्केटमध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या हाय परफॉर्मन्स बाईक्स ऑफर करत असतात. यातीलच एक मोठे नाव म्हणजे Royal Enfield. आजही रॉयल एन्फिल्डच्या बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. कंपनीच्या बाईक्स फक्त भारतातच नाही तर जगभरात सुद्धा पसंत केल्या जातात. कंपनीच्या बुलेट 350 आणि हंटर 350 ची क्रेझ तरुणांमध्ये खूप जास्त आहे. या दोन्ही बाईक्स त्यांच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखल्या जातात. लोकांना या बाईकची डिझाइन आणि फीचर्स खूप आवडतात.
या दोन्ही बाईकपैकी कोणती चांगली आहे आणि कोणत्या बाईकचा मायलेज जास्त आहे याबद्दल लोकांमध्ये गोंधळ आहे. म्हणूनच आज आपण दोन्ही बाईक्सच्या मायलेजबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही स्वतः ठरवू शकाल की कोणती बाईक खरेदी करणे योग्य आहे.
जर आपण रॉयल एनफील्ड हंटर आणि बुलेटच्या मायलेजबद्दल बोललो तर दोन्ही बाईक्सच्या मायलेजमध्ये थोडा फरक आहे. जर आपण बुलेटच्या मायलेजबद्दल बोललो तर ते 35 ते 37 किमी प्रति लिटर आहे. याशिवाय, हंटरचा मायलेज प्रति लिटर 30 ते 32 किमी आहे. परंतु, दोन्ही बाईकचे इंजिन सारखेच आहेत.
रॉयल एनफील्ड बुलेट 350 ही जे-सिरीज प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि या बाईकला 349 सीसी, एअर कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. बुलेट 350 मधील इंजिन 6,100 आरपीएम वर 20 बीएचपी पॉवर निर्माण करते आणि 4,000 आरपीएम वर 27 एनएम टॉर्क जनरेट करते. बुलेट 350 च्या बॅटालियन ब्लॅक शेडची एक्स-शोरूम किंमत 1.75 लाख रुपयांपासून सुरू होते.
March 2025 मध्ये कार खरेदी करण्याची सुवर्ण संधी, Tata Cars वर मिळतोय भरघोस डिस्काउंट !
रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 349 सीसी, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे, जे इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे तेच इंजिन आहे, जे मेटिअर 350 आणि क्लासिक 350 मध्ये देखील वापरले जाते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि 6100 आरपीएमवर 20.2 बीएचपी पॉवर आणि 4,000 आरपीएमवर 27 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक 114 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते.