फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक ऑटो कंपनीज आहे ज्या उत्तोमोत्तम कार्स देशात उपलब्ध करून देत असतात. त्यातही काही कंपनीज अशा आहेत ज्यांच्या फक्त नावानेच ग्राहक कार्स खरेदी करत असतात. इथे आपण मारुती सुझुकी बद्दल बोलत आहोत.
मारुती सुझुकी ही देशातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे, जी तिच्या उत्तम आणि बजेट फ्रेंडली कार्ससाठी ओळखली जाते.नुकतेच कंपनीने डिझायरचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये लाँच केले आहे. कंपनीच्या कार्सना विदेशात सुद्धा चांगली मागणी पाहायला मिळत असते. गेल्या महिन्यातील म्हणजेच ऑक्टोबरमधील कार निर्यातीचा अहवाल पाहिल्यास हे स्पष्ट होते.
ऑक्टोबर 2024 च्या महिन्यात टॉप-10 एक्स्पोर्ट कारच्या यादीत मारुतीचे 5 मॉडेल आहेत. ज्यामध्ये त्याचे 3 मॉडेल टॉप-5 मध्ये समाविष्ट आहेत. या यादीत मारुतीच्या लोकप्रिय एसयूव्ही फ्रंटेक्सने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर भारतीय बाजारात सर्वात कमी विकली जाणारी मारुती जिमनी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. एवढेच नाही तर होंडासाठी एलिव्हेटचे विक्रमी युनिट्सही निर्यात करण्यात आले.
जर आपण ऑक्टोबर 2024 मध्ये टॉप-10 एक्स्पोर्ट कारबद्दल बोललो तर मारुती फ्रोन्क्सच्या 7,070 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये त्याची 2,274 युनिट्स विकली गेली. याचा अर्थ असा की त्याने 4,796 अधिक युनिट्स विकले आणि 210.91% ची वार्षिक वाढ झाली. त्याच वेळी, एकूण निर्यातीत त्याचा बाजारातील हिस्सा 11.49% होता.
तुमच्याही कारमध्ये LED हेडलॅम्प आहे का? हिवाळ्यात ड्रायव्हिंग करताना उद्भवू शकतात ‘या’ 5 समस्या
ऑक्टोबर 2024 मध्ये मारुती डिझायरच्या 4,525 युनिट्सची निर्यात करण्यात आली. तर ऑक्टोबर 2023 मध्ये 1,957 युनिट्सची निर्यात झाली. यानुसार या कारचे 2,568 अधिक युनिट्स विकले गेले आणि 131.22% ची वार्षिक वाढ झाली. त्याच वेळी, त्याचा बाजार हिस्सा 7.35% होता. ऑक्टोबर 2024 मध्ये मारुती बलेनोच्या 4,373 युनिट्सची निर्यात करण्यात आली. तर ऑक्टोबर 2023 मध्ये 4,595 युनिट्सची निर्यात झाली. याचा अर्थ 222 युनिट्स कमी विकल्या गेल्या आणि वार्षिक 4.83% ची वाढ झाली. त्याच वेळी, त्याचा बाजार हिस्सा 7.11% होता.
ऑक्टोबर 2024 मध्ये मारुती जिमनीच्या 5,802 युनिट्सची निर्यात करण्यात आली. त्याच वेळी, ऑक्टोबर 2023 मध्ये 1,924 युनिट्सची निर्यात झाली. याचा अर्थ 3,878 अधिक युनिट्स विकले आणि 201.56% ची वार्षिक वाढ झाली. त्याच वेळी, त्याचा बाजार हिस्सा 9.43% होता.
ऑक्टोबर 2024 मध्ये, Hyundai Grand 110 च्या 4,707 युनिट्सची निर्यात करण्यात आली. आणि ऑक्टोबर 2023 मध्ये 3,474 युनिट्सची निर्यात झाली, या आकडेवारीनुसार या कारचे 1,233 अधिक युनिट्स विकले आणि 35.49% ची वार्षिक वाढ झाली. त्याच वेळी, त्याचा बाजार हिस्सा 7.65% होता. ऑक्टोबर 2024 मध्ये ह्युंदाई वेर्नाच्या 4,641 युनिट्सची निर्यात करण्यात आली. त्याच वेळी, ऑक्टोबर 2023 मध्ये 3,663 युनिट्सची निर्यात झाली, म्हणजेच या कारचे 978 अधिक युनिट्स विकले आणि 26.7% ची वार्षिक वाढ झाली. त्याच वेळी, त्याचा बाजार हिस्सा 7.54% होता.