ऑटोमोबाईल उद्योगात अनेक तंत्रज्ञानांनी काळाच्या पुढे जाऊन भविष्याची झलक दाखवली. काही तंत्रज्ञान जुन्याकाळी फारसे लोकप्रिय झाले नाहीत. अशीही काही कार तंत्रज्ञाने विकसित झाली ज्यांना फक्त लक्झरी कारमध्ये वापरल जायच. मात्र आता या सगळ्या तंत्रज्ञानाना सर्रास सर्व कारमध्ये वापरलं जात. इतकेच नव्हे तर आधुनिक कार उद्योगाचा ही तंत्रज्ञाने अविभाज्य भाग बनली आहेत. अशाच १० क्रांतिकारी कार तंत्रज्ञानांबद्दल आज इथे जाणून घेऊया.
या तंत्रज्ञानांनी त्यांच्या काळात ऑटोमोबाईल उद्योगाला नवीन दिशा दिली. त्यापैकी अनेक सुरुवातीला महाग, अवघड किंवा अनावश्यक वाटत होती; मात्र आज ती सुरक्षितता, सोय आणि कार्यक्षमतेसाठी अत्यावश्यक ठरली आहेत. भविष्यातील स्वयंचलित आणि कनेक्टेड वाहनांची पायाभरणी याच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांनी केली आहे.






