फोटो सौजन्य: @mobilreview (X.com)
भारतीय मार्केटमध्ये कार्सच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच आता मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार देखील मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. यामुळे भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री अजून मोठी होत आहे. पण प्रत्येक कार्सला ग्राहकांची आवडती कार बनत आहे. असे देखील नाही. आज आपण अशा कारबद्दल जाणून घेणार आहोत, जिला मागील 12 महिन्यांपासून फक्त 9 खरेदीदार मिळाले आहे.
नवीन बाईक खरेदी करताय? Hero Splendor पासून Passion पर्यंत, Hero च्या सर्वच बाईक झाल्या महाग
भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच मध्यम आकाराच्या SUV ची मागणी राहिली आहे. जर आपण आर्थिक वर्ष 2025 मधील विक्रीबद्दल बोललो तर, या सेगमेंटमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओने 1,60,000 पेक्षा जास्त एसयूव्ही विकून यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. पण, त्याच काळात या सेगमेंटमधील सेल्स रिपोर्टमध्ये Citroen C5 Aircross निराशाजनक ठरली. या कालावधीत, C5 Aircross ने SUV च्या तर फक्त 9 युनिट्स विकल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये वार्षिक 83.93 टक्के घट झाली. सिट्रोएन C5 एअरक्रॉसचे फीचर्स, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
या सिट्रोएन एसयूव्हीच्या केबिनमध्ये ग्राहकांना 10.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 12.3-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, रेन सेन्सिंग वायपर्स, क्रूझ कंट्रोल आणि पॉवर टेलगेट सारखी फीचर्स मिळतात. तर प्रवाशांच्या सेफ्टीसाठी, कारमध्ये 6-एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि मागील पार्किंग कॅमेरा सारखी फीचर्स आहेत.
दुसरीकडे, पॉवरट्रेन म्हणून, ही सिट्रोएन एसयूव्ही 2.0-लिटर डिझेल इंजिनने सुसज्ज आहे जी 177 bhp ची कमाल पॉवर आणि 400 NM चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारचे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ग्राहकांना कारमध्ये 2 ड्राइव्ह मोड मिळतात. भारतीय बाजारात सिट्रोएन C5 एअरक्रॉसची एक्स-शोरूम किंमत 39.99 लाख रुपये आहे.