फोटो सौजन्य: @ulisesupdate (X.com)
आपली स्वतःची कार खरेदी करण्याचा क्षण हा इतर आनंददायी क्षणांपैकी एक असतो. काही जणांचे तर स्वप्न असते की आपल्या कुटुंबाला साजेशी कार आपण खरेदी करावी. हेच स्वप्न साकार करण्यासाठी न जाणो कित्येक जण कष्ट करत असतात. भारतात अनेक उत्तम कार्स आहेत, ज्यांना ग्राहकांकडून दमदार प्रतिसाद मिळतो. यातीलच एक कार म्हणजे Renault Kwid.
भारतीय मार्केटमध्ये स्वस्त आणि जास्त मायलेज असलेल्या कार्सना नेहमीच मोठी मागणी मिळते. असे असूनही, अनेक वेळा बजेटअभावी लोक कार खरेदी करू शकत नाहीत. पण तुम्ही फक्त 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर रेनॉल्ट क्विड कार खरेदी करू शकता तर? मोठी गोष्ट म्हणजे 30000 रुपये पगार असलेले लोकही ही कार सहज खरेदी करू शकतात.
महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक, दुचाकी आडवी पाडून केले जोरदार निदर्शने
तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की रेनॉल्ट क्विडच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपये आहे. त्याच वेळी, राजधानी दिल्लीत त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 5.24 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, आता जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन ही कार खरेदी केली तर तुम्हाला बँकेकडून 4.24 लाख रुपयांचे कर्ज मिळेल.
जर तुम्ही हे कार लोन 5 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने दरमहा 9000 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशाप्रकारे, 60 हप्त्यांमध्ये रेनॉल्ट क्विड खरेदी केल्यास, तुम्हाला सुमारे 1.25 लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील.
फक्त 50 हजारांच्या डाउन पेमेंटवर Fortuner खरेदी केली तर किती द्यावा लागेल EMI?
कंपनीने रेनॉल्ट क्विड 1.0 आरएक्सई व्हेरियंटमध्ये 999 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 67 बीएचपीची मॅक्स पॉवर आणि 9 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, त्यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. कंपनीच्या मते, ही कार प्रति लिटर सुमारे 21 किमी मायलेज देते. यात 28 लिटरचे फ्युएल टॅंक देखील आहे.
फीचर्सनुसार, कंपनीने रेनॉल्ट क्विडमध्ये पॉवर स्टीअरिंग, लेन चेंज इंडिकेटर, टॅकोमीटर, रिअर स्पॉयलर, एलईडी डीआरएल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट, चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्युअल एअरबॅग्जसह ट्रॅक्शन कंट्रोल यासारख्या अनेक उत्तम फीचर्सचा समावेश केला आहे. बाजारात ही कार Maruti Suzuki Alto K10 ला आव्हान देते.