फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये बाईक्सची विक्री नेहमीच मोठ्या संख्येने होत असते. यात अनेकदा ग्राहकांचा कल हा बजेट फ्रेंडली बाईक खरेदी करण्याकडे जास्त असतो. ते नेहमीच स्वस्तात मस्त बाईकला जास्त प्राधान्य देत असतात. सध्या भारतात बजेट फ्रेंडली बाईक ऑफर करणाऱ्या अनेक बाईक आहेत. आणि त्यातीलच एक कंपनी म्हणजे Hero MotoCorp.
Hero MotoCorp कंपनी आपल्या उत्तम मायलेज देणाऱ्या बजेट फ्रेंडली बाईकसाठी ओळखली जाते. परंतु कंपनीने आता त्यांच्या बाईकच्या किमती वाढवल्या आहेत. या ब्रँडच्या बाईक कमी किमतीत उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखल्या जातात. पण आता हिरोने त्यांच्या लेटेस्ट एमिशन नॉर्म्सनुसार आपल्या बाईक्स अपडेट केल्या आहेत. या अपडेटसह, स्प्लेंडर प्लस, पॅशन प्लस आणि ग्लॅमरच्या किमतीत वाढ झाली आहे. चला या बाईक्सच्या नवीन किमतीबद्दल जाणून घेऊया.
हिरो स्प्लेंडर प्लस ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे. हिरोने या बाईकची किंमत 1,750 रुपयांनी वाढवली आहे. यापूर्वी या बाईकची एक्स-शोरूम किंमत 77,176 रुपयांपासून सुरू झाली होती. आता या बाईकची एक्स-शोरूम किंमत 78,926 रुपयांपासून सुरू होते.
नवीन अपडेटसह हिरो पॅशन प्लसची किंमतही 1,750 रुपयांनी वाढली आहे. ही बाईक OBD 2B एमिशन नॉर्म्सनुसार तयार करण्यात आली आहे. या हिरो बाईकची एक्स-शोरूम किंमत आधी 79,901 रुपये होती. आता या बाईकची एक्स-शोरूम किंमत 81,651 रुपयांपासून सुरू होते.
Super Splendor Xtec देखील नवीन एमिशन नॉर्म्ससह बाजारात लाँच करण्यात आली आहे. या बाईकच्या किमतीत 2000 रुपयांची वाढ झाली आहे. अपडेटपूर्वी, या हिरो बाईकची एक्स-शोरूम किंमत 86,128 रुपयांपासून सुरू झाली. आता या बाईकची किंमत दोन हजार रुपयांनी वाढल्यानंतर त्याची सुरुवातीची किंमत 88,128 रुपये झाली आहे.
आता ड्रायव्हिंग होईल गारेगार ! ‘या’ 5 सर्वात स्वस्त कारच्या सीट्समधून निघते थंडगार हवा
सुपर स्प्लेंडर एक्सटेक प्रमाणे, हिरो ग्लॅमरची किंमत देखील 2000 रुपयांनी वाढली आहे. हिरोने आधीच 100 सीसी इंजिनसह पॅशन प्लस आणि स्प्लेंडर प्लस अपडेट केले आहेत. यानंतर, हे अपडेट 125 सीसी बाईक हिरो ग्लॅमरमध्येही दिसून आले आहे. यापूर्वी, ग्लॅमरची एक्स-शोरूम किंमत 84,698 रुपयांपासून सुरू झाली. आता या बाईकची एक्स-शोरूम किंमत 86,698 रुपयांपासून सुरू होते.