फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटअंतर्गत वाहनं ऑफर होत असतात. यात सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. Compact SUV सेगमेंटच्या विक्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हीच वाढती मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या बेस्ट कार ऑफर करत आहे.
मारुती सुझुकीने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर करत असते. नुकतेच एक रिपोर्ट जारी झाला आहे, ज्यात Compact SUVs च्या मे 2025 विक्रीबद्दल माहिती मिळाली आहे. चला जाणून घेऊयात की कोणत्या कंपनीच्या कोणत्या एसयूव्हीने विक्रीच्या बाबतीत टॉप-5 मध्ये स्थान मिळवले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
KTM ने सादर केली Toyota Fortuner च्या किमतीची बाईक, फक्त 100 युनिट्सची होणार विक्री
मारुती सुझुकी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ब्रेझा विकते. गेल्या महिन्यात विक्रीच्या बाबतीत ही एसयूव्ही पहिल्या क्रमांकावर आहे. माहितीनुसार, गेल्या महिन्यात देशभरात या एसयूव्हीच्या 15566 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.
मारुतीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणखी एक एसयूव्ही विक्रीसाठी सादर केली आहे. गेल्या महिन्यात विक्रीच्या बाबतीत मारुती फ्रॉन्क्स दुसऱ्या क्रमांकावर होती. माहितीनुसार, गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 13584 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.
मारुती व्यतिरिक्त, टाटा मोटर्स देखील अनेक सेगमेंटमध्ये वाहने विकते. माहितीनुसार, टाटाची एसयूव्ही टाटा पंच देखील खूप पसंत केली जाते. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 13133 युनिट्स विकल्या गेल्या. ज्यामुळे ही कार या सेल्स रिपोर्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टाटाच्या आणखी एका एसयूव्हीने टॉप-5 मध्ये स्थान मिळाले आहे. गेल्या महिन्यात देशभरात टाटा नेक्सॉन एसयूव्हीच्या 13096 युनिट्स विकल्या गेल्या.
आता कार चालवण्यासाठी ड्रायव्हरची गरज नाही ! येत्या 22 जून 2025 रोजी लाँच होणार Tesla ची ‘ही’ खास कार
कियाने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये किया सोनेटची विक्री केली आहे. ही एसयूव्ही लाँच झाल्यापासून खूप पसंत केली जात आहे. माहितीनुसार, गेल्या महिन्यात देशभरात तिच्या 8054 युनिट्स विकल्या गेल्या. ज्यामुळे या कारने टॉप-5 मध्ये स्थान मिळवले आहे.
गेल्या महिन्यात देशभरात टॉप-5 व्यतिरिक्त, महिंद्रा XUV 3XO च्या 7952 युनिट्स, ह्युंदाई व्हेन्यूच्या 7520 युनिट्स, ह्युंदाई एक्स्टरच्या 5899 युनिट्स, स्कोडा काइलाकच्या 4949 युनिट्स आणि Kia Syros च्या 3611 युनिट्सची विक्री झाली.