फोटो सौजन्य: X.com
अभिनेते धर्मेंद्र हे नेहमीच आपल्या उत्तम चित्रपट आणि त्यातील दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. मात्र, याव्यतिरिक्त ते त्यांच्या कार कलेक्शनसाठी देखील ओळखले जातात. त्याच्याकडे विंटेज आणि लक्झरी कारचे मोठे कलेक्शन आहे. त्याच्या कार कलेक्शनमधून त्याचा साधेपणा आणि नंतरचे यश दोन्ही दिसून येते. चला त्यांच्या कार केलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.
धर्मेंद्र यांच्यासाठी Fiat 100 ही कार सर्वात महत्त्वाची आहे, कारण ती त्यांच्या कारकिर्दीतीळ पहिली कार आहे. 1960 च्या दशकात फक्त 18,000 रुपयांना खरेदी केलेली ही त्यांची पहिली कार होती. आजही धर्मेंद्र या कारची खूप काळजी घेतात आणि सोशल मीडियावर वारंवार त्याचे व्हिडिओ शेअर करतात. ही त्यांच्या जुन्या आठवणी आणि संघर्षाचे प्रतीक आहे.
Audi च्या ‘या’ 2 अफलातून कार भारतात लाँच, मिळणार दमदार फीचर्स
लॅंड रोव्हर रेंज रोव्हर (Land Rover Range Rover): धर्मेंद्र रेंज रोव्हरचे मोठे चाहते आहेत. त्यांच्या कलेक्शनमध्ये या प्रीमियम एसयूव्हीच्या विविध जनरेशनचे मॉडेल्स आहेत. रेंज रोव्हर तिच्या लक्झरीयस राइड आणि दमदार ऑफ-रोड क्षमतेसाठी ओळखली जाते.
लॅंड रोव्हर रेंज रोव्हर इवोक (Land Rover Range Rover Evoque): ही आधुनिक, स्टायलिश आणि लक्झरीयस एसयूव्ही त्यांच्या कलेक्शनमधील आणखी एक खास मॉडेल आहे.
पहिल्यांदाच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर झाली Toyota Hilux 2025, केव्हा होणार लाँच?
मर्सेडीज-बेंझ एस-क्लास (Mercedes-Benz S-Class): जगातील सर्वोत्कृष्ट लक्झरी सेडानपैकी एक मानली जाणारी ही कार कम्फर्ट आणि अत्याधुनिक फीचर्ससाठी प्रसिद्ध आहे.
मर्सेडीज-बेंझ SL500 (Mercedes-Benz SL500): ही एक क्लासिक स्पोर्ट्स कन्व्हर्टिबल कार असून स्टाइल आणि पॉवरचा उत्कृष्ट संगम सादर करते.
फिएट 1100 सारख्या साध्या कारपासून सुरुवात करून रेंज रोव्हर आणि मर्सेडीजसारख्या प्रीमियम कारपर्यंतचा धर्मेंद्र यांचा प्रवास त्यांच्या यशाची कहाणी सांगतो.






