फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कंपन्या आहेत, ज्या लक्झरी सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर करत असतात. बजेट फ्रेंडली कारसोबत भारतात लक्झरी कार्सची सुद्धा जोरदार चर्चा असते. हीच मागणी लक्षात अनेक कार उत्पादक कंपन्या दमदार लक्झरी कार्स ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Audi.
आघीडीची लक्झरी कार उत्पादक कंपनी Audi ने Audi Q3 आणि A5 चा सिग्नेचर लाइन एडिशन लाँच केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
October 2025 मध्ये ‘या’ Cars चा दरारा वाढत चाललाय! जाणून घ्या Top-5 वाहनांबद्दल
ऑडीने भारतात त्यांच्या सध्याच्या एसयूव्हीचे सिग्नेचर लाइन लाँच केले आहे. कंपनीने Audi Q3, Q3 Sportsback आणि Audi Q5 लाँच केली आहे. या कार्समध्ये अनेक प्रभावी फीचर्स आहेत. चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
कंपनीने या कारमध्ये एलईडी गेट लॅम्प, एक्सक्लुझिव्ह ऑडी रिम डेकल्स, नवीन व्हील हब कॅप्स, केबिनमध्ये सुगंध डिस्पेंसर, मेटल की, स्टेनलेस स्टील पेडल कव्हर्स प्रदान केले आहेत. क्यू३ सिग्नेचर लाइन आणि क्यू3 स्पोर्टबॅकमध्ये पार्क असिस्ट प्लस, 12 व्ही आउटलेट आणि यूएसबी पोर्ट देखील आहे. ऑडी क्यू3 सिग्नेचर लाइनमध्ये नवीन 18-इंच स्पोर्टी अलॉय व्हील्स देखील आहेत, तर क्यू5 मध्ये 19-इंच अलॉय व्हील्स आहेत.
New Hyundai Venue ची चावी खिशात घेऊन फिराल! फक्त दरमहा असेल ‘इतकाच’ EMI
ऑडी इंडिया चे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों म्हणाले की ऑडी Q3 आणि ऑडी Q5 या दोनही मॉडेल्स भारतातील आमच्या Q पोर्टफोलिओचा मजबूत आधार आहेत. ग्राहकांची वाढती पसंती आणि त्यांच्या सेगमेंटमधील सततची उत्तम कामगिरी यामुळे ही मॉडेल्स अग्रस्थानी आहेत. ऑडी Q3 आणि ऑडी Q5 सिग्नेचर लाईनद्वारे आम्ही अधिक परिष्कृत कामगिरी आणि प्रगत फीचर्सचे संयोजन एका आकर्षक पॅकेजमध्ये सादर करत आहोत. हा एडिशन आमच्या इनोव्हेशन आणि ग्राहककेंद्रित डिझाइनवरील लक्षाला आणखी बळकटी देतो. सिग्नेचर लाईनमुळे ग्राहकांना Q3 आणि Q5 यांच्या आणखी खास पर्यायांची खरेदी करण्याची संधी मिळते.
ऑडी Q3 ची एक्स-शोरूम किंमत 52.31 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तिच्या स्पोर्टबॅक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 53.55 लाख रुपये आहे. ऑडी Q5 ची एक्स-शोरूम किंमत 69.86 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.






