फोटो सौजन्य: Gemini
भारतातील वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेत River Mobility ने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कंपनीने कर्नाटकातील होस्कोट येथील त्यांच्या मॅन्युफॅक्चर प्लांटमधून 20,000 River Indie इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादित केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, कंपनीने लाँच झाल्यापासून अवघ्या दोन वर्षातच हा टप्पा गाठला. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
Royal Enfield Classic 350 ला धोबीपछाड देणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त, आता किंमत फक्त…
ही कामगिरी कंपनीसाठी महत्त्वाची आहे कारण रिव्हर मोबिलिटीने फक्त 6 महिन्यांपूर्वी 10000 युनिट्सचा टप्पा गाठला होता. वाढती मागणी, मजबूत उत्पादन क्षमता आणि वेगाने वाढणारे डीलर नेटवर्क यामुळे ही वाढ शक्य झाली आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.
रिव्हर मोबिलिटी आपले रिटेल नेटवर्क सतत मजबूत करत आहे. अलीकडेच, कंपनीने राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रासह अनेक नवीन राज्यांमध्ये आपली उपस्थिती वाढवली. याव्यतिरिक्त, कंपनीने Indie Gen 3 चे नवीन व्हर्जन लाँच केले आणि उत्तर भारतात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी दिल्लीत कंपनीच्या मालकीचे स्टोअर उघडले.
रिव्हर मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि सीईओ अरविंद मणी म्हणाले, “20,000 इंडी स्कूटर्सचा हा टप्पा आमच्या ग्राहकांना आमच्या स्कूटरवर किती प्रेम आहे याचा पुरावा आहे. आम्ही नवीन शहरांमध्ये विस्तार करत असताना आणि प्रोडक्शन वाढवत असताना, आमचे लक्ष प्रत्येक रायडरचा अनुभव सुधारण्यावर आहे.”
रिव्हर मोबिलिटी सध्या देशभरात अंदाजे 40 स्टोअर्स चालवते. कंपनीची दक्षिण भारतात, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची आणि कोइम्बतूरसह मजबूत उपस्थिती आहे. कंपनीचे पुढील ध्येय पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या प्रमुख राज्यांमध्ये प्रवेश करणे आहे.






