फोटो सौजन्य: Gemini
GST कमी झाल्यानंतर Jawa 350 च्या किमतीत तब्बल 15,543 रुपयांची घट झाली असून आता ही बाईक Royal Enfield Classic 350 ला जोरदार टक्कर देऊ शकते. रेट्रो डिझाइनसोबत मॉडर्न टेक्नोलॉजी हवी असणाऱ्यांसाठी Jawa 350 आता अधिक आकर्षक पर्याय ठरते. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
किंमत कमी झाल्यानंतर Jawa 350 आता 1,83,407 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, जे आधी 1,98,950 होते. रंग आणि व्हेरिएंटनुसार किंमत 2.11 लाख पर्यंत जाते. दुसरीकडे, Royal Enfield Classic 350 ची सुरुवातीची किंमत 1,81,129 आहे. म्हणजेच दोन्ही बाईक्सची किंमत आता जवळजवळ सारखी असून Jawa 350 थेट Classic 350 च्या रेंजमध्ये आली आहे.
2026 चे नवीन वर्ष ‘या’ Electric SUVs साठी ओळखले जाणार, फटाफट होईल लाँच
Jawa 350 मध्ये 334cc लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 22.57 PS पॉवर आणि 28.1 Nm टॉर्क निर्माण करते. यात 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-असिस्ट क्लच मिळतो, ज्यामुळे राइड स्मूथ राहते आणि हायवेवर ही बाईक सहज 125 kmph ची स्पीड गाठू शकते. लिक्विड-कूलिंग सिस्टम लांबच्या प्रवासात इंजिन स्थिर ठेवतो.
याच्या तुलनेत Classic 350 मध्ये 349cc एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे, जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क देते. याचा 5-स्पीड गिअरबॉक्स साधा आहे आणि इंजिन Jawa इतकं रिफाइंड मानलं जात नाही, पण Classic चा आयकॉनिक Thump आवाज तिला वेगळं स्थान देतो.
Jawa 350 चा ARAI मायलेज 30 kmpl असून रिअल-वर्ल्डमध्ये ती साधारण 28.5 kmpl देते. तर Classic 350 ARAI नुसार 41.55 kmpl देते आणि सामान्यतः यूजर्स 32–35 kmpl सांगतात. शहरातील ट्रॅफिकमध्ये Jawa चे लिक्विड-कूल्ड इंजिन अधिक स्थिर वाटते, पण मायलेजमध्ये Classic अजूनही पुढे आहे.
Jawa 350 ला रेट्रो स्टाइलसोबत मॉडर्न फीचर्स देण्यात आले आहेत. जसे की






