India Book of Records मध्ये Tata Sierra चा डंका!
टाटा मोटर्सच्या नवीन टाटा सिएरा एसयूव्हीने मायलेज देण्याच्या बाबतील मोठी झेप घेत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव नोंदवले आहे. नॅट्रॅक्स, इंदौर येथे झालेल्या प्रमाणित टेस्ट ड्राइव्हमध्ये सिएराने 12 तासांत 29.9 किमी/लीटर इतका मायलेज नोंदवला आहे. हा विक्रम पिक्सल मोशन टीमने 30 नोव्हेंबर 2025 रोजी साधला.
2 लाखांचं Down Payment आणि नवी कोरी Tata Sierra ची थेट होम डिलिव्हरी, जाणून घ्या EMI?
या विक्रमामागील मुख्य कारण म्हणजे सिएरामध्ये दिलेले नवीन 1.5-लीटर हायपेरियन पेट्रोल इंजिन. हाय परफॉर्मन्स, कमी घर्षण रचना, प्रगत कम्बशन सिस्टिम आणि टॉर्क-संपन्न परफॉर्मन्स बँडमुळे संपूर्ण ड्राइव्हदरम्यान स्थिर कामगिरी आणि उत्तम मायलेज मिळाले. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या कालावधीत वाहन केवळ एकदाच ड्रायव्हर बदलासाठी थांबले.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर मोहन सावरकर म्हणाले, “सिएराने इतक्या लवकर राष्ट्रीय स्तरावर कार्यक्षमतेचा विक्रम करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हायपेरियन प्लॅटफॉर्म पेट्रोल इंजिनची क्षमता किती पुढे जाऊ शकते हे दाखवतो. या यशामुळे सिएराचे मूल्य आणि टाटा मोटर्सची भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्याची बांधिलकी अधिक मजबूत होते.”
कमबॅक झालाय बॉस! भल्याभल्या बॉलिवूड स्टार्सलाही लाजवेल असे Akshaye Khanna चे कार कलेक्शन
मायलेजशिवाय टाटा सिएराने नॅट्रॅक्समध्ये विशेष चाचणी परिस्थितीत 222 किमी/तासचा टॉप स्पीडही गाठला. यामुळे 1.5-लीटर हायपेरियन इंजिनची शक्ती आणि क्षमतेची पुष्टी होते.
टाटा सिएराच्या बेस मॉडेलची किंमत 11.49 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलची किंमत 18.49 लाखांपर्यंत जाते.






