राज्यातील 'या' महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन
महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या इंटरसिटी मार्गांपैकी एक असलेल्या या ठिकाणी उभारलेले हे स्टेशन प्रीमियम सुपरचार्जिंग नेटवर्क उभारण्याच्या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या सुविधेमुळे व्होल्वोच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी समर्पित चार्जिंग बे उपलब्ध असून, इतर EV वापरकर्त्यांनाही जलद आणि कार्यक्षम चार्जिंगचा अनुभव मिळणार आहे.
डायनॅमिक लोड बॅलन्सिंग तंत्रज्ञानामुळे वाहनांना सानुकूल ऊर्जा वितरण मिळते, ज्यामुळे प्रतीक्षा वेळ कमी होऊन रिअल-वर्ल्डमध्ये जलद चार्जिंग शक्य होते. ॲप-आधारित नेव्हिगेशन आणि पेमेंट सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांना सुलभ आणि त्रासमुक्त अनुभव मिळतो.
डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल
उद्घाटनप्रसंगी व्होल्वो कार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी सांगितले की, शाश्वत गतीशीलतेसाठी परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. ग्राहकांना लक्झरी, कार्यक्षमता आणि विश्वासार्ह चार्जिंग पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
चार्जझोनचे संस्थापक व CEO कार्तिकेय हरियाणी यांनी सांगितले की, हे पहिले को-ब्रँडेड 360 kW अल्ट्रा-फास्ट स्टेशन भविष्यासाठी सज्ज प्रीमियम चार्जिंग नेटवर्क उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हाय-स्पीड, तंत्रज्ञान-आधारित पायाभूत सुविधा उभारून लांब पल्ल्याच्या प्रवासाला चालना देण्यावर कंपनीचा भर आहे.
दोन्ही कंपन्यांनी 2025 मध्ये सामंजस्य करार (MoU) करून प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर हाय-स्पीड EV चार्जिंग सुविधा वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे स्टेशन सुरू करण्यात आले असून, 2026 मध्ये आणखी काही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आहे.
या सहयोगातून देशभरात शाश्वत गतीशीलतेला चालना देत लक्झरी आणि कार्यक्षम इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वाढवण्याचे उद्दिष्ट दोन्ही कंपन्यांनी व्यक्त केले आहे.






