फोटो सौजन्य: @Parikshitl (x.com)
भारतात अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या आगामी वाहनांसोबत अनेक प्रयोग करत असते. हे नवीन प्रयोग वाहनांची विक्री देखील वाढवतात. असाच एक प्रयोग बजाज कंपनीने 2024 मध्ये जगातील पहिली सीएनजी बाईक आणून केले होते. ही बाईक लाँच झाल्यावर ग्राहकांनी देखील चांगला याला प्रतिसाद दिला.
भारतीय बाजारपेठेत दुचाकी वाहनांना मोठी मागणी आहे. असेच एक मोठे उदाहरण म्हणजे जगातील पहिली सीएनजी बाईक, Bajaj Freedom 125. या सीएनजी बाईकने लाँच होताच विक्रीच्या बाबतीत खळबळ उडवून दिली. बजाजची ही बाईक केवळ किफायतशीरच नाही तर चांगली मायलेज देखील देते.
Tesla भारतात आपला जलवा दाखवणार; एप्रिल महिन्यात लाँच करू शकते पहिली EV
जर तुम्हीही परवडणाऱ्या किमतीच्या बाईकच्या शोधात असाल तर बजाज फ्रीडम 125 तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. बजाज फ्रीडम 125 बाईक परवडणारी किंमत, उत्कृष्ट मायलेज आणि उत्तम फीचर्स सह येते. जर तुम्हाला बजाजची ही सीएनजी बाईक डाउन पेमेंटवर खरेदी करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
दिल्लीमध्ये बजाज फ्रीडम 125 NG04 Drum बाईकची एक्स-शोरूम किंमत 89 हजार रुपयांपासून सुरू होते. या बाईकची ऑन-रोड किंमत 1 लाख 3 हजार रुपये आहे. बाईक देखो वेबसाइटनुसार, तुम्ही ही बाइक 10 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता.
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ही बाईक लोनवर घ्यायची असेल, तर डाउन पेमेंटनंतर तुम्हाला 93 हजार 657 रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. आता हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला 3 वर्षांसाठी दरमहा 3 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागेल. अशा प्रकारे, तुम्हाला एकूण 1 लाख 8 हजार 324 रुपये द्यावे लागतील.
बजाज फ्रीडम बाईकमध्ये 125 सीसीचे शक्तिशाली इंजिन आहे, जे उत्तम पॉवर तसेच जबरदस्त मायलेज देते. त्याची रचना खूपच आकर्षक आहे आणि ती तरुणाई तसेच कुटुंबाला लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. या बाईकमध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले, एलईडी लाईट्स आणि आरामदायी सीट्स यासारखे अनेक उत्तम फीचर्स मिळतात. ही आरामदायी बसण्याची जागा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
तरुणांची ‘ही’ आवडती बाईक नव्याने झाली लाँच, किंमत 1.56 लाखांपासून सुरु
ही बाईक परवडणाऱ्या किमतीत लाँच करण्यात आल्याने तिला खूप पसंती मिळत आहे. या बाईकबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक 60-65 किमी प्रति लिटर मायलेज देते, ज्यामुळे इंधन वापराच्या बाबतीत ती किफायतशीर ठरते.
ही बाईक डिजिटल डिस्प्ले, एलईडी लाईट्स आणि आरामदायी बसण्याची सुविधा यासारख्या फीचर्सनी सुसज्ज आहे, ज्यामुळे ती लांब अंतरासाठी देखील एक उत्तम पर्याय बनते. पेट्रोल मोडमध्ये ही बाईक 130 किलोमीटरची रेंज देते. कंपनीचा दावा आहे की या बाईकमधील दोन्ही इंधन एकत्रितपणे 330 किलोमीटरपर्यंतचा मायलेज देतात.