फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करत असतात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना तर विशेष मागणी असते. अनेक वर्षांपासून मारुती सुझुकी आणि टोयोटा चांगल्या कार उत्पादित करत आहे. एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती आणि टोयोटा कडून अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या सेगमेंटमध्ये टोयोटा टायसर तर मारुतीकडून फ्रॉन्क्सची विक्री केली जाते. या दोन्ही एसयूव्हीमधील इंजिन किती शक्तिशाली आहेत आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स उपलब्ध आहेत. तसेच यांची किंमत किती आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
मारुती फ्रँक्स एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, ऑटो हेडलॅम्प, एलईडी कनेक्टेड टेल लाईट, रिअर वायपर आणि वॉशर, स्पॉयलर, स्किड प्लेट, शार्क फिन अँटेना, ड्युअल टोन एक्सटीरियर, फॅब्रिक सीट, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग व्हील, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर एसी व्हेंट, फूटवेल इल्युमिनेशन, 22.86 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, आर्किमिस ऑडिओ सिस्टम, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, चार स्पीकर्स, दोन ट्विटर, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा अशी अनेक फीचर्स आहेत.
तेच Toyota Urban Cruiser Hyryder मध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, ऑटो हेडलॅम्प, कनेक्टेड एलईडी टेल लाईट, रिअर वायपर आणि वॉशर, स्किड प्लेट, शार्क फिन अँटेना, ड्युअल टोन एक्सटीरियर आणि इंटीरियर, फॅब्रिक सीट, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग व्हील, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, आणि असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.
कमीत कमी किती डाउन पेमेंट केल्यास Range Rover Velar होईल तुमची? असा असेल EMI चा हिशोब
मारुतीने पुढच्या भागात दिलेल्या सेफ्टी फीचर्समध्ये ESP, हिल होल्ड असिस्ट, सहा एअरबॅग्ज, रिअर व्ह्यू कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सरसह डिस्प्ले, सीट बेल्ट अलार्म, रिअर डिफॉगर, ISOFIX चाइल्ड अँकरेज, ब्रेकडाउन नोटिफिकेशन, चोरीला गेलेले वाहन ट्रॅकिंग आणि नोटिफिकेशन, जिओफेन्स यांचा समावेश आहे.
टोयोटा टायसरमध्ये 6 एअरबॅग्ज, व्हीएससी, हिल होल्ड असिस्ट, रिअर व्ह्यू कॅमेरा, एबीएस, ईबीडी, सीट बेल्ट अलार्म, रिअर डिफॉगर, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, टोयोटा आयकनेक्ट सारखी सेफ्टी फीचर्स देखील आहेत.
मारुती फ्रॉन्क्स भारतीय मार्केटमध्ये 7.52 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.48 लाख रुपये आहे.
टोयोटा टायसरची एक्स-शोरूम किंमत 7.74 लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 12.88 लाख रुपये आहे.