फोटो सौजन्य: iStock
भारतात नेहमीच विविध सेगमेंटमध्ये कार्स विकल्या जातात. त्यामुळे ग्राहक आपापल्या आवश्यकतेनुसार कार खरेदी करत असतात. अनेक कंपन्या जास्तकरून बजेट फ्रेंडली कार ऑफर करण्यावर जास्त भर देत असतात. यातही हॅचबॅक कार्सना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. नुकताच मागील महिन्यातील सेल्स रिपोर्ट जारी झाला आहे. ज्यात हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी स्विफ्टने बाजी मारली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय ग्राहकांमध्ये हॅचबॅक कारची मागणी नेहमीच राहिली आहे. जर आपण गेल्या महिन्याबद्दल म्हणजेच मे 2025 बद्दल बोललो तर, मारुती सुझुकी स्विफ्टने या सेगमेंटमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. गेल्या महिन्यात मारुती सुझुकी स्विफ्टने एकूण 14,135 कार विकल्या आहेत. तर या काळात, मारुती स्विफ्टच्या विक्रीत वार्षिक आधारावर 27 टक्क्यांची घट झाली. हाच आकडा मे 2024 मध्ये एकूण 19,393 युनिट्स होता. भारतीय मार्केटमध्ये, मारुती सुझुकी स्विफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलमध्ये 6.49 लाख रुपयांपासून ते 9.64 लाख रुपयांपर्यंत आहे. गेल्या महिन्यातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या काही हॅचबॅक कारच्या विक्रीबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.
Skoda च्या सर्वात स्वस्त कारची धमाकेदार विक्री, मात्र आता किंमतीत झाली मोठी वाढ
या विक्रीच्या यादीत मारुती सुझुकी वॅगनआर दुसऱ्या क्रमांकावर होती. या कालावधीत मारुती वॅगनआरने एकूण 13,949 कार विकल्या, ज्यात वार्षिक आधारावर 13,949 टक्के घट झाली. तर या विक्री यादीत मारुती सुझुकी बलेनो तिसऱ्या क्रमांकावर होती. मारुती बलेनोचे एकूण 11,618 कार विकल्या, ज्यामध्ये वार्षिक आधारावर 10 टक्के घट झाली. याशिवाय, टाटा टियागो या विक्री यादीत चौथ्या क्रमांकावर होती. या कालावधीत टाटा टियागोने एकूण 6,407 कार विकल्या, ज्यामध्ये वार्षिक आधारवर 8 टक्क्यांची वाढ झाली.
दुसरीकडे, विक्रीच्या या यादीत मारुती सुझुकी अल्टो पाचव्या स्थानावर होती. या काळात मारुती अल्टोने एकूण 4,970 कार विकल्या, ज्यात वार्षिक आधारवर 35 टक्क्यांची घट झाली. याशिवाय, टोयोटा ग्लांझा विक्रीच्या यादीत सहाव्या स्थानावर होती. या कारचे एकूण 4,753 युनिट्स विकल्या, ज्यामध्ये 5 टक्के वाढ झाली. तर ग्रँड 110 एनआयओएस विक्रीच्या यादीत सातव्या स्थानावर होती. या काळात ग्रँड 110 एनआयओएसने एकूण 4,344 कार विकल्या, ज्यामध्ये वार्षिक 18 टक्के घट झाली.
याला म्हणतात दिलदार कंपनी ! ‘या’ खास कारणामुळे कर्मचाऱ्यांना दिल्या कस्टमाईज Hyundai Creta
विक्रीच्या यादीत ह्युंदाई 120 आठव्या स्थानावर होती. या कारचे एकूण 4,090 कार विकल्या, ज्यामध्ये वार्षिक आधारावर 21 टक्के घट झाली. याशिवाय, विक्रीच्या यादीत टाटा अल्ट्रोज नवव्या स्थानावर होती. या कारच्या वार्षिक विक्रीत 44 टक्क्यांची घट झाली. तर मारुती सुझुकी सेलेरियो दहाव्या स्थानावर होती. या कालावधीत मारुती सेलेरियोने एकूण 1,861 युनिट्सची विक्री केली, ज्यामध्ये वार्षिक आधारावर 44 टक्क्यांची घट झाली.