फोटो सौजन्य; @Parth_Go (X.com)
भारतीय ऑटो बाजार नेहमीच विदेशातील ऑटो कंपन्यांना खुणावत असते. त्यामुळेच येथे विविध देशातील ऑटो कंपन्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणजे स्कोडा. स्कोडाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. अशातच आता कंपनीच्या एका कारच्या विक्रीत धमाकेदार वाढ झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये स्कोडाच्या कार्सची एक वेगळी क्रेझ आहे. कंपनीने गेल्या वर्षी Skoda Kylaq लाँच केली होती, तेव्हापासून या कारला मोठी मागणी आहे. कंपनीच्या या कारने गेल्या महिन्यात एकूण 4 हजार 949 युनिट्स विकल्या आहेत. चला या कारच्या फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
स्कोडा क्यलॅक लाँचच्या वेळी भारतीय बाजारात इंट्रोडक्टरी प्राइस टॅगसह सादर करण्यात आली होती, ज्यामुळे सुरुवातीचे ग्राहक आकर्षित झाले होते, परंतु गेल्या महिन्यात स्कोडाने सब फॉर मीटर एसयूव्ही Kylaq च्या किमती बदलल्या आहेत.
याला म्हणतात दिलदार कंपनी ! ‘या’ खास कारणामुळे कर्मचाऱ्यांना दिल्या कस्टमाईज Hyundai Creta
खरंतर, इंट्रोडक्टरी कालावधी संपल्यानंतर, कंपनीने त्याच्या सर्व व्हेरियंटच्या किमतींचा आढावा घेतला आहे आणि नवीन किमती लागू केल्या आहेत, ज्यामुळे काही व्हेरियंटच्या किमती वाढल्या आहेत. याशिवाय, टॉप व्हेरियंटची किंमत कमी करण्यात आली आहे.
Skoda Kylaq ची नवीन सुरुवातीची किंमत आता 8.2 लाख रुपये आहे, तर पूर्वी ती 7.89 लाख रुपये होती. म्हणजेच, एंट्री-लेव्हल व्हेरियंटमध्ये 31,000 ची वाढ दिसून आली आहे
एकीकडे एंट्री आणि मिड व्हेरियंट महाग झाले, तर दुसरीकडे प्रेस्टीज आणि प्रेस्टीज एटी व्हेरियंट सारख्या टॉप-एंड ट्रिमच्या किमती 40,000 रुपयांपेक्षा जास्त प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. आता या व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
मेट्रोपेक्षाही स्वस्त आहे ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवरून अप-डाउन करणं, मिळेल 150 किमीची रेंज
स्कोडा कायलॅक भारतात 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात आली आहे, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यात पॉवर्ड सीट्स आहेत ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक आरामदायी होते, तर प्रगत इन्फोटेनमेंट सिस्टम मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटीचा उत्तम अनुभव देते.
सेफ्टीच्या बाबतीत, ही कार 6 एअरबॅग्ज सारख्या फीचर्ससह येते. याशिवाय, क्रूझ कंट्रोल आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानासारखी प्रगत फीचर्स देखील त्यात आहेत, ज्यामुळे ही एसयूव्ही उर्वरित सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक मजबूत आणि प्रीमियम पर्याय बनते.