भारतात 4 लाखात मिळणारी कार पाकिस्तानात 23 लाखात मिळतेय, जाणून घ्या Swift, Wagon R ची किंमत
भारत आणि पाकिस्तान, हे दोन असे देश आहेत ज्याची नेहमीच चर्चा होताना दिसते, नुकतेच 2025 ची चॅम्पिअनस ट्रॉफी भारताने आपल्या नावावर केली. पण जेवढी चर्चा अंतिम सामन्याची झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा तर भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्यात झाली. पण क्रिकेटव्यतिरिक्त, भारत आणि पाकिस्तानची तुलना अन्य परिस्थितीत देखील होत असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतात सर्वात स्वस्त मिळणाऱ्या कारची पाकिस्तानात किती किंमत असेल? चला याबद्दल जाणून घेऊया.
भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होत राहते. विशेषतः, दोन्ही देशांमध्ये एखाद्या वस्तूची किंमत किती आहे? किंवा किंमतीत किती फरक आहे? याबद्दल जास्त चर्चा होताना दिसते.
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आता होईल अधिकच स्वस्त, त्यातही कंपनीकडून मिळतेय डिस्काउंट
भारत ही जगभरातील लहान आणि मोठ्या कंपन्यांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. विशेषतः जेव्हा ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार केला जातो तेव्हा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा बाजार असल्याचे दिसून येते. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात विकली जाणारी मारुती अल्टो सारखी कार पाकिस्तानमध्ये खूप जास्त किमतीत उपलब्ध आहे.
उदाहरणार्थ, भारतात मारुती अल्टो K10 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.2 लाख रुपये आहे. तर पाकिस्तानमध्ये त्याची किंमत तब्बल 23.31 लाख रुपये आहे. म्हणजेच पाकिस्तानमध्ये ही कार भारतापेक्षा 5.51 पट महाग आहे. कंपनीच्या लाइनअपमध्ये वॅगनआर, स्विफ्ट सारखे मॉडेल्स देखील समाविष्ट आहेत.
अंबानी-शाहरुखकडे असणारी कार Urvashi Rautela च्या ताफ्यात, किंमत तब्बल 12 कोटी !
या कारच्या किमतींमधील फरक जाणून घेण्यापूर्वी, आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की भारत पाकिस्तानपेक्षा खूप मजबूत आहे. म्हणजे आपला 1 रुपया पाकिस्तानच्या 3.21 पाकिस्तानी रुपयांच्या बरोबरीचा आहे. म्हणजे जर तुम्ही पाकिस्तानमध्ये भारतीय रुपयांना अल्टो K10 खरेदी केली तर तुम्हाला त्यासाठी 7.26 लाख रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच भारताच्या तुलनेत 3 लाख रुपयांपेक्षा जास्त. चला भारतातील काही कार्सच्या किमती पाकिस्तानात किती आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
भारतात अल्टोची किंमत 4.23 लाख रुपये आहे तर पाकिस्तानात याची किंमत 23.31 लाख रुपये आहे. वॅगन आरची किंमत भारतात 5.65 लाख रुपये आहे तर पाकिस्तानात या कारची किंमत 32.14 लाख आहे. तेच 6.49 लाखात मिळणारी स्विफ्ट पाकिस्तानात 43.36 लाख रुपयात उपलब्ध आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये विकल्या जाणाऱ्या मॉडेल्सच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मध्येही मोठा फरक आहे. पाकिस्तानात अजूनही जुनी अल्टो विकली जात आहे. त्यात फक्त 600 सीसी इंजिन आहे.