फोटो सौजन्य: @MotorOctane/X.com
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात दरवर्षी अनेक नवी मॉडेल्स लाँच होतात, पण काही कार अशा आहेत ज्या वर्षानुवर्षे ग्राहकांच्या मनात आपली खास ओळख टिकवून आहेत. याच श्रेणीत मोडणारी लोकप्रिय कार म्हणजे Maruti Eeco. तर चला, पाहूया की जीएसटी कमी झाल्यास या कारची किंमत कितपत कमी होऊ शकते.
या दिवाळीत मोदी सरकारकडून अनेक गरजेच्या वस्तूंवर जीएसटी कमी करण्याची योजना आखली जात आहे. यामध्ये छोट्या कार्सचा देखील समावेश आहे. सध्या 1200cc पेक्षा कमी इंजिन आणि 4 मीटरपेक्षा छोटी कार्सवर 28% GST + 1% सेस आकारला जातो. प्रस्तावित बदलानंतर हा दर 18% GST + 1% सेस इतका केला जाऊ शकतो. याचा थेट फायदा मिडल क्लास ग्राहकांना मिळणार आहे.
Toyota Kirloskar Motor ने ऑगस्ट 2025 मध्ये केली ‘इतक्या’ वाहनांची विक्री
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सध्या ग्राहकांना कारच्या एक्स-शोरूम किंमतीवर 28% जीएसटी आणि 1% सेस द्यावा लागतो. पण जर जीएसटी कमी झाला, तर ग्राहकांना फक्त 18% जीएसटी आणि 1% सेस द्यावा लागेल. ही ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.
Maruti Eeco ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5,69,500 रुपये आहे. याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 6,96,000 रुपये आहे. जर मारुती ईकोच्या बेस व्हेरिएंटवर जीएसटी कपात लागू झाली, तर ही कार तुम्हाला जवळपास 56,950 रुपये स्वस्त मिळेल.
मारुती ईको दोन पॉवरट्रेन पर्यायांसह येते, पेट्रोल आणि CNG. यातील 1.2-लिटर K-सीरिज पेट्रोल इंजिन 80.76 PS ची पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क निर्माण करतो. या इंजिनसोबत टूर व्हेरिएंटला 20.2 km/l तर पॅसेंजर व्हेरिएंटला 19.7 km/l इतका मायलेज मिळतो.
CNG व्हर्जन 71.65 PS ची पॉवर आणि 95 Nm टॉर्क तयार करतो. यात टूर व्हेरिएंटला 27.05 km/kg आणि पॅसेंजर व्हेरिएंटला 26.78 km/kg मायलेज मिळतो. त्यामुळे ईकोचे CNG मॉडेल फ्युएल सेव्हिंगच्या दृष्टीने खूपच किफायतशीर पर्याय ठरतो.
मारुती ईकोमध्ये आता आधीपेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स दिले गेले आहेत. यात रिव्हर्स पार्किंग सेन्सर, इंजिन इमोबिलायझर, चाइल्ड लॉक, सीट बेल्ट रिमाइंडर, EBD सोबत ABS आणि टॉप ट्रिम्समध्ये 6 एअरबॅग्स दिले आहेत.
आता S-Presso आणि Celerio मधून नवीन स्टिअरिंग व्हील आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे घेतले गेले आहे, ज्यामुळे इंटिरिअर आणखी प्रीमियम वाटते. तसेच स्लायडिंग एसी कंट्रोल काढून टाकून त्याऐवजी रोटरी डायल देण्यात आला आहे.