Honda आणणार 1000cc बाईक, स्पोर्ट्स टूरिंग सेगमेंट होणार मोठा धमाका
Honda ने आतापर्यंत अनेक उत्तम वाहनं ऑफर केली आहेत. बजेट फ्रेंडली बाईकपासून ते पॉवरफुल बाईकपर्यंतच्या रेंजमध्ये देखील कंपनीने ग्राहकांना उत्तम ऑप्शन्स दिले आहेत. ग्राहक देखील बाईक खरेदी करताना कंपनीच्या बाईक्सना पहिले प्राधान्य देत असतात. आता लवकरच कंपनी 1000 सीसी सेगमेंटमध्ये नवीन बाईक ऑफर करणार आहे.
होंडा लवकरच त्यांची नवीन बाईक, होंडा CB1000 GT सादर करणार आहे. ही बाईक एक शक्तिशाली स्पोर्ट्स टूरिंग बाईक म्हणून ओळखली जाईल. ही CB1000 Hornet वर आधारित आहे, परंतु त्यात सर्व टूरिंग फीचर्स आहेत. ती इतर अनेक ॲडव्हेंचर फीचर्सनी सुसज्ज आहे. कंपनीच्या लाँचिंगपूर्वीच ही माहिती समोर आली आहे. होंडाच्या नवीन स्पोर्ट्स टूरिंग बाईकमध्ये कोणती खास फीचर्स असतील त्याबद्दल जाणून घेऊयात.
200cc बाईक्सचे धाबे दणाणणार! ‘ही’ कंपनी आणतेय त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक
ही बाईक पूर्णपणे टुरिंग-फोकस्ड डिझाइनसह सादर केली जाणार आहे. यात हाफ-फेअरिंग, लांब विंडस्क्रीन, आणि हँडगार्ड्स सारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील, ज्यामुळे लांब प्रवास अधिक आरामदायक होईल. यासोबतच सेंटर स्टँड आणि जाड सीट देखील दिली जाणार आहे, जी रायडर आणि पिलियन दोघांनाही अतिरिक्त आराम देईल.
रायडरचे फुटपेग्स पुढच्या दिशेने ठेवले गेले आहेत, ज्यामुळे लांब प्रवासादरम्यान अधिक आरामदायी पोझिशन मिळते. पिलियनसाठीही पाय ठेवण्याची सोयीस्कर स्थिती देण्यात आली आहे. ही बाईक 17-इंच व्हील्सवर धावणार असून त्यामुळे ती अधिक मजबूत आणि स्थिर राहते.
Honda सोडून ‘या’ कंपनीच्या Scooter मागे ग्राहकांची धावपळ! झपाझप मिळवला 29 टक्के मार्केटवर ताबा
Honda CB1000 GT मध्ये तोच 1000cc इनलाइन-4 इंजिन देण्यात आला आहे, जो CB1000 Hornet मध्ये वापरला जातो. हे इंजिन 157 hp ची पॉवर आणि 107 Nm टॉर्क निर्माण करते. मात्र, GT व्हेरिएंटमध्ये ही पॉवर थोडी कमी असू शकते किंवा CB1000 Hornet च्या स्टँडर्ड व्हर्जनइतकी म्हणजेच 152 hp पर्यंत असू शकते. इंजिनव्यतिरिक्त, बाईकच्या स्विंगआर्म आणि व्हीलबेस मध्येही बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे अधिक मजबूत आणि स्थिर रायडिंग अनुभव मिळतो.
Honda CB1000 GT मध्ये लांब प्रवासासाठी योग्य अशा लाँग-ट्रॅव्हल सस्पेन्शनचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये Nissin चे 4-पिस्टन कॅलिपर्स दिले जाणार आहेत, जे याची ब्रेकिंग क्षमता अधिक प्रभावी बनवतात.
Honda CB1000 GT चे डिझाइन आणि फीचर्स ही बाईक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तसेच हाय-परफॉर्मन्स राइडिंगसाठी योग्य बनवतात. ही बाईक Kawasaki Versys 1100 आणि BMW S 1000 XR सारख्या प्रतिस्पर्ध्यांसमोर एक मजबूत पर्याय ठरू शकते. मात्र, Honda हा मॉडेल भारतात लाँच करणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.






