फोटो सौजन्य: Social Media
देशात मोठ्या प्रमाणात बाईक्स विक्री होते, ज्यात वेगवेगळ्या कंपनीच्या बाईक विकल्या जातात. खरंतर बाईक खरेदी करताना ग्राहक नेहमीच स्वस्त किमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक खरेदी करत असतात. म्हणूनच दुचाकी उत्पादक कंपन्या देखील मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली बाईक आणतात. जेणेकरून जास्तीतजास्त बाईक्सची विक्री होईल.
भारतीय मार्केटमध्ये अशा अनेक बजेट फ्रेंडली बाईक्स उपलब्ध आहे. त्यातीलच एक म्हणजे Honda Shine 2025 . होंडाने आतापर्यंत भारतीय ग्राहकांची डिमांड समजून चांगल्या बाईक ऑफर केल्या आहेत. त्यातही कंपनीची शाइन बाईक ही ग्राहकांची आवडती बाईक आहे. पण आता याच बाईकची किंमत कंपनीकडून वाढवण्यात आली आहे.
Kawasaki कडून नवीन बाईक लाँच, किंमत एवढी की दारात उभी राहील नवीन कार
होंडा शाइन ही भारतातील लोकांच्या सर्वात आवडत्या बाईक्सपैकी एक आहे. कंपनीने ही बाईक नवीनतम OBD-2B नॉर्म्ससह अपडेट केली आहे. या बाईकमध्ये डिजी-अॅनालॉग युनिटऐवजी पूर्णपणे डिजिटल डॅश देखील आहे. या अपडेटनंतरच होंडा शाइनची किंमत वाढवण्यात आली आहे. या बाईकची किंमत 1,994 रुपयांनी वाढली आहे.
होंडा शाइन बाजारात ड्रम (Drum) आणि डिस्क (Disc) अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या बाईकच्या ड्रम व्हेरियंटची किंमत 1,242 रुपयांनी वाढली आहे, ज्यामुळे या व्हेरियंटची किंमत आता 84,493 रुपये झाली आहे. त्याच वेळी, डिस्क व्हेरियंटची किंमत 1,994 रुपयांनी वाढली आहे, ज्यामुळे या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 89,245 रुपये झाली आहे.
2025 Honda Shine मॉडेलमध्ये पूर्णपणे डिजिटल डॅश बसवण्यात आला आहे. या अपडेटसह, रिअल टाइम मायलेज इंडिकेटर आणि डिस्टन्स टू एपीटी डिस्प्ले सारखी अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आली आहेत. या होंडा बाईकमध्ये डॅशजवळ यूएसबी-टाइप सी पोर्ट बसवण्यात आला आहे, ज्यामुळे बाईकवरून प्रवास करतानाही मोबाईल फोन सहज चार्ज करता येतो.
बाजारात ग्राहक अनेक पण ‘या’ SUV साठी ठरतेय डोकेदुखी, विक्रीच होईना; कारण काय?
होंडा शाईनमधील इंजिन देखील अपडेट करण्यात आले आहे. त्यात नवीनतम OBD-2B नॉर्म्स जोडले गेले आहेत. पण इंजिन अपडेट केल्यानंतरही ही बाईक पूर्वीसारखेच पॉवर आणि टॉर्क प्रदान करते. ही बाईक ४-स्ट्रोक, SI, BS-VI इंजिनने सुसज्ज आहे, जी 7,500 आरपीएम वर 7.9 किलोवॅट पॉवर निर्माण करते आणि 6,000 आरपीएम वर 11 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे ARAI प्रमाणित मायलेज 55 किमी प्रति लिटर आहे. या बाईकमध्ये 10.5 लिटरची इंधन टाकी क्षमता आहे, त्यामुळे एकदा टाकी भरली की, ही बाईक सुमारे 575 किलोमीटर सहज चालवता येते.