फोटो सौजन्य; @HyundaiUAE (X.com)
भारतात अनेक उत्तम कार्स उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक कार म्हणजे Hyundai Creta. या कारची किंमत ही 11 लाख रुपये आहे. मात्र तरी सुद्धा ही कार तुमची होऊ शकते.
आपली स्वतःची कार खरेदी करणं हा एक सुखद सोहळा असतो. तसेच हे कित्येक जणांचे स्वप्न देखील असते. हेच स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. पण आज अनेक जणांना कारचे फुल्ल पेमेंट देता येत नाही. अशावेळी अनेक जण EMI ची मदत घेतात.
आपल्याच दोन 5 सीटर कारवर भारी पडली देशातील ‘ही’ स्वस्त 7 सीटर कार, March 2025 ठरला खास
भारतात स्वदेशी आणि विदेशी ऑटो कंपन्या देशात उत्तम कार्स ऑफर करत आहेत. यातीलच एक उत्तम कार म्हणजे Hyundai Creta. भारतीय मार्केटमध्ये ह्युंदाईने अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. ह्युंदाई क्रेटा ही भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे. ह्युंदाई क्रेटाची किंमत ही 11.11 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 20.50 लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल पण कमी बजेटमुळे ते करू शकत नसाल, तर तुम्ही या कारचे सर्वात स्वस्त मॉडेल EMI वर घरी आणू शकता. कसे? चला जाणून घेऊया.
ह्युंदाई क्रेटाच्या सर्वात स्वस्त प्रकाराची किंमत नवी दिल्लीत ११.११ लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला सुमारे १० लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते आणि तुम्हाला १ लाख रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजानुसार, दरमहा एक निश्चित रक्कम बँकेत जमा करावी लागेल.
2025 TVS Apache RR 310 भारतात लाँच, किमतीत मात्र ‘इतक्या’ रुपयांची वाढ
जर तुम्ही ह्युंदाई क्रेटा खरेदी करण्यासाठी सात वर्षांसाठी कर्ज घेतले आणि बँक या कर्जावर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर दरमहा सुमारे तुम्हाला 16 हजार रुपयांचा ईएमआय बँकेत जमा करावा लागेल. जर तुमचा महिन्याचा पगार 50 हजार रुपये असेल तर ही कार तुमच्या बजेटमध्ये येऊ शकते.
जर तुम्ही ही ह्युंदाई कार खरेदी करण्यासाठी सहा वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा सुमारे 18 हजार रुपये ईएमआय बँकेत 9 टक्के व्याजदराने जमा करावे लागतील. जर ह्युंदाई क्रेटाचे हे पेट्रोल व्हेरियंट खरेदी करण्यासाठी पाच वर्षांसाठी कर्ज घेतले असेल, तर 9 टक्के व्याजदराने 60 महिन्यांसाठी दरमहा 21 हजार रुपयांचा ईएमआय जमा करावा लागेल.