फोटो सौैजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजार आणि येथील ग्राहक हा नेहमीच परदेशी ऑटो कंपन्यांसाठी खास राहिला आहे. त्यामुळेच देशात स्वदेशी ऑटो कंपन्यांसोबतच विदेशी ऑटो कंपन्या देखील कार्यरत आहे. या विविध कंपन्यांमध्ये नेहमीच नंबर 1 च्या पोजिशनसाठी रस्सीखेच सुरु असते. मात्र आज आपण अशा एका कंपनीच्या कारबद्दल जाणून घेणार आहोत, जिने आपल्याच कारला विक्रीच्या बाबतीत मागे टाकले आहे.
रेनॉल्ट इंडियाचा मार्च महिन्यातील विक्रीचा डेटा समोर आला आहे. कंपनी भारतीय बाजारात एकूण 3 मॉडेल्स विकते. यामध्ये एक परवडणारी क्विड हॅचबॅक, एक किगर एसयूव्ही आणि एक ट्रायबर एमपीव्हीचा समावेश आहे.
Kawasaki Ninja 650 चा स्पेशल एडिशन लाँच, मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
कंपनीची ट्रायबर ही देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे. बाजारात ती मारुती एर्टिगा आणि किआ कॅरेन्स सारख्या मॉडेल्सला जोरदार टक्कर देते. परंतु, विक्रीच्या बाबतीत, या दोन MPV पेक्षा खूप मागे आहे. तसे, ट्रायबर ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये याची विक्री किगर आणि क्विडपेक्षा जास्त होती यावरूनही या कारच्या विक्रीचा अंदाज लावता येतो.
जर आपण गेल्या 3 महिन्यांतील रेनॉल्ट इंडिया मॉडेल्सच्या विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर जानेवारीमध्ये ट्रायबरच्या 1,456 युनिट्स, फेब्रुवारीमध्ये 1,545 युनिट्स आणि मार्चमध्ये 1,552 युनिट्स विकल्या गेल्या.
जानेवारीमध्ये किगरने 755 युनिट्स, फेब्रुवारीमध्ये 433 युनिट्स आणि मार्चमध्ये 762 युनिट्स विकल्या. जानेवारीमध्ये क्विडच्या 569 युनिट्स, फेब्रुवारीमध्ये 698 युनिट्स आणि मार्चमध्ये 532 युनिट्स विकल्या गेल्या. म्हणजेच, कंपनीने जानेवारीमध्ये 2,780 युनिट्स, फेब्रुवारीमध्ये 2,676 युनिट्स आणि मार्चमध्ये 2,846 युनिट्स विकल्या.
रेनॉल्ट ट्रायबर लिमिटेड एडिशनमध्ये देखील खरेदी करता येईल. तुम्ही ही कार कॉन्ट्रास्ट ब्लॅक रूफसह मूनलाईट सिल्व्हर आणि सीडर ब्राउन या ड्युअल-टोन रंगांमध्ये खरेदी करू शकता. यात नवीन 14-इंच फ्लेक्स व्हील्स देखील आहेत. यात पियानो ब्लॅक फिनिशसह ड्युअल-टोन डॅशबोर्ड आहे.
2025 TVS Apache RR 310 भारतात लाँच, किमतीत मात्र ‘इतक्या’ रुपयांची वाढ
ट्रायबरमध्ये 1.0-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे पेट्रोल इंजिन 71 एचपीची कमाल शक्ती आणि 96 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटीशी जोडलेले आहे. या कारचे मायलेज 18 ते 19 किमी प्रति लिटर पर्यंत आहे.
या कारमध्ये ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यामध्ये माउंटेड कंट्रोल्ससह स्टीअरिंग, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, एलईडी डीआरएलएससह प्रोजेक्टर हेडलॅम्प, सिक्स-वे ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट अशा अनेक उत्तम फीचर्सचा समावेश आहे. त्यात नवीन स्टायलिश फॅब्रिक अपहोल्स्ट्री देखील आहे. पूर्णपणे डिजिटल पांढरा एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रोम रिंगसह एचव्हीएसी नॉब्स आणि ब्लॅक इनर डोअर हँडल या कारला स्टायलिश बनवतात.