फोटो सौजन्य: @TataMotors_Cars (X.com)
भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. टाटा मोटर्स हे त्यातीलच एक आघाडीचे नाव. टाटाने देशात अनेक उत्तम कार लाँच केल्या आहेत, ज्यांना ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार कार ऑफर करत असते. कंपनीच्या अनेक कार मार्केटमध्ये लोकप्रिय आहे. Tata Punch ने तर विक्रीचे रेकॉर्ड्स मोडले आहेत.
भारतीय मार्केटमध्ये अशा कारची मागणी असते ज्या किफायतशीर असण्यासोबतच चांगले मायलेज देतात. अशीच एक एसयूव्ही म्हणजे टाटा पंच, ज्याला बजेट-फ्रेंडली कार देखील म्हणता येईल. या कारची किंमत सात लाख रुपयांपेक्षाही कमी आहे.
सिंगल चार्जवर 548 KM ची रेंज ! प्रिमियम इलेक्ट्रिक कार MG M9 झाली लाँच, किंमत किती?
जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पंच खरेदी करण्यासाठी पूर्ण पैसे देणे आवश्यक नाही. ही टाटा कार तुम्ही लोन घेऊन सुद्धा घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा काही हजार रुपये ईएमआय म्हणून बँकेत जमा करावा लागेल.
एका वेबसाइटनुसार, टाटा पंचच्या प्युअर पेट्रोल व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत 6.66 लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून 5.99 लाख रुपयांचे लोन मिळेल. कार लोनची रक्कम तुमचा क्रेडिट स्कोअर किती चांगला आहे यावर अवलंबून असते. या लोनवरील व्याजदरानुसार, तुम्हाला दरमहा बँकेत जाऊन EMI स्वरूपात निश्चित रक्कम भरावी लागेल.
टाटा पंचचा पेट्रोल व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी, 60000 रुपयांचे डाउन पेमेंट भरावा लागेल. जर बँक पंचच्या खरेदीवर 9.8 टक्के व्याज आकारते आणि तुम्ही हे लोन 4 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला दरमहा 15,326 रुपयांचा EMI जमा करावा लागेल.
Kia Sonet Vs Maruti Breeza: मायलेज, इंजिन, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार आहे बेस्ट?
जर तुम्ही 10000 रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 4 वर्षांसाठी सुमारे 18,282 रुपयांचा EMI भरावा लागेल.
जर तुम्ही हे कर्ज पाच वर्षांसाठी घेतले, तर 9.8% व्याजदरावर तुमची मासिक EMI अंदाजे ₹12,828 इतकी असेल. भारतातील विविध राज्यांनुसार टाटा पंच ची किंमत थोडीफार बदलू शकते, त्यामुळे कर्जाची एकूण रक्कम देखील वेगळी असू शकते. शिवाय, कर्जावर लागू होणाऱ्या व्याजदरात बदल झाल्यास EMI च्या रकमेवरही परिणाम होऊ शकतो.