फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात अनेक विदेशी ऑटो कंपन्या कार्यरत आहेत, ज्या मार्केटमध्ये बेस्ट फिचर आणि परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करतात. यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे किया मोटर्स. कियाने देशात ग्राहकांच्या आवडी आणि मागणीनुसार उत्तम कार ऑफर केल्या आहेत. ग्राहक देखील कंपन्यांच्या कार्सना उत्तम प्रतिसाद देत आहेत. पण आता कंपनीने मार्केटमध्ये आपली एक कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण कोरियाची कंपनी किया ही Kia Carens ही बजेट एमपीव्ही म्हणून ऑफर करते. पण, आता कंपनीने या MPV चे सर्व व्हेरियंट बंद केले आहेत. आता ही कार फक्त एकाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. असा निर्णय कंपनीकडून का घेण्यात आला? कोणता व्हेरियंट आता ऑफर केला जाणार आहे? त्याची किंमत किती आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
कियाने कॅरेन्स एमपीव्हीचे अनेक व्हेरियंट बंद केले आहेत. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देखील अपडेट केली आहे.
कियाने नुकतेच 8 मे 2025 रोजी नवीन एमपीव्ही म्हणून Kia Carens Clavis सादर केली आहे. ही एमपीव्ही 23 मे 2025 रोजी अधिकृतपणे लाँच केली जाईल. याची विक्री सुरु झाल्यानंतर लगेचच, कॅरेन्सचे अनेक व्हेरियंट बाजारातून बंद करण्यात आले आहेत.
कंपनी आता फक्त एकाच व्हेरियंटमध्ये कॅरेन्सची विक्री करणार आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कॅरेन्स आता फक्त Premium (O) व्हेरियंटमध्ये (7-seater Premium O Carens) ऑफर केली जाते. ज्यामध्ये सात सीट्सचा पर्याय दिला जाईल.
कंपनीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कॅरेन्सच्या एकाच व्हेरियंटमध्ये तीन इंजिन पर्याय ऑफर केले जातील. त्यात फक्त स्मार्टस्ट्रीम G1.5 T-GDi 6iMT, स्मार्टस्ट्रीम G1.5 6MT आणि 1.5L CRDi VGT 6MT व्हेरियंट उपलब्ध असतील.
कोलकातामध्ये टाटा मोटर्सचे नवीन वाहन स्क्रॅपिंग केंद्र सुरू; पर्यावरणपूरक स्क्रॅपिंगला चालना
Kia Carens Pemium (O) 7 सीटर कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत. यात 15 आणि 16 इंच टायर्स, हॅलोजन लॅम्प, हॅलोजन टेल लॅम्प, शार्क फिन अँटेना, टिल्ट स्टीअरिंग, पॉवर विंडो, रिअर व्ह्यू कॅमेरा, 12.5 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आठ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले, सेमी लेदरेट सीट्स, टाइप सी चार्जिंग पोर्ट, की-लेस एंट्री, सात रंग पर्यायांसह अनेक फीचर्स असतील.
कंपनीने जाहीर केले आहे की Carens MPV मध्ये ABS, EBD, ESC, HAC, VSM, DBC, 6 एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, ISOFIX चाइल्ड अँकरेज, इत्यादी सेफ्टी फीचर्स असतील.