फोटो सौजन्य- iStock
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कपनींने जाहीर केले आहे की, देशातून तब्बल 30 लाखांहून अधिक कार या परदेशामध्ये पाठवल्या आहेत. अलीकडेच कंपनीने 1053 कारचे युनिट परदेशात पाठवले त्यात Celerio, FrontX, Baleno, Ciaz, Dezire आणि S-Presso सारख्या लोकप्रिय कार मॉडेलचा समावेश होता. देशात कायम अव्वल असणाऱ्या मारुती सुझुकीला जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून मागणी आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक शीपद्वारे युनिट परदेशात पाठवल्या जात असतात.
मारुती सुझुकीचा प्रवास
1986 पासून मारुती सुझुकीने निर्यात मोहीम सुरु केली. कंपनीने कारची पहिली बॅच ही हंगेरीला पाठवली होती. ज्यामध्ये 500 युनिट्स होत्या. त्यानंतर कंपनीने मागे वळून पाहिले नाही 2012-13 मध्ये कंपनीने 10 लाख निर्यातीचा टप्पा ओलांडला. त्यानंतर 2020-21 मध्ये पुढील 10 लाखांचा टप्पा ओलांडला आणि एकूण 20 लाख कार निर्यात झाली. आणि अवघ्या 3 वर्षे 9 महिन्यांच्या कालावधीत कंपनीने पुढील 10 लाखाचा टप्पा ओलांडत 30 लाख कारच्या निर्यातीचा विक्रम प्रस्थापित केला. यावरुन गेल्या 4 वर्षात निर्यातीचा वेग हा तिपटीने वाढला आहे.
कंपनीची निर्यात आणि देश
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे एमडी आणि सीईओ हिसाशी ताकेउची यांनी या निर्यातीच्या विक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत सरकारची धोरणे आणि व्यापार करारांमुळे कंपनीला निर्यातीत चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे.
मारुती सुझुकी कंपनी सध्या प्राध्यान्याने आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकांच्या बाजारपेठांमध्ये आपली विविध श्रेणीतील वाहने निर्यात करते. दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया आणि चिली सारख्या देशात कंपनीची मॉडल्स अतिशय लोकप्रिय आहेत. तेथे कंपनीचे मॉडल्स सुझुकी ब्रॅंड अंतर्गत विकले जातात.
ग्रॅंड विटारा आणि जिमनी
ग्रॅंड विटाराच्या भारतातील उत्तम कामगिरी नंतर कंपनीने अलीकडेच ग्रँड विटारा आणि जिमनी सारख्या काही नवीन कारचा निर्यात यादीत समावेश केला आहे. याशिवाय सुझुकीने Fronx क्रॉसओवर SUV कारला जपान सारख्या बाजारपेठेत पाठवण्यास सुरुवात केली आहे.
कंपनीची पुढील वाटचाल
मारुती सुझुकीने मागील चार वर्षांत निर्यातीच्या बाबतीत तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे आकडेवारी कंपनीच्या कार्सना असलेली वाढती मागणी दर्शवते. दरम्यान, कंपनीने आता मोठे लक्ष्य समोर ठेवले आहे त्यानुसार 2030-31 पर्यंत कपंनी दरवर्षी 7.5 लाख युनिट्सची निर्यात करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
देशातील अव्वल कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने केलेली कामगिरी ही देशातील उत्पादन जगभरात लोकप्रिय ठरत आहे हे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवणाऱ्या मारुती सुझुकीला भारतासहित जागतिक बाजारपेठेवर लक्ष्य केंद्रित करुन वाहनांची निर्मिती करणे आता आवश्यक ठरणार आहे.