फोटो सौजन्य: www.jawayezdimotorcycles.com
जीएसटी कमी झाल्याने अनेक बाईकच्या किमतीत मोठी घट दिसून आली आहे. यातही 350cc बाईकवर तर आता ग्राहक तुटून पडले आहेत. या सेगमेंटमध्ये भारतात विविध दुचाकी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Jawa Yezdi Motorcycles. जर तुम्ही सुद्धा या कंपनीच्या बाईक खरेदी करणार असाल तर चला याच्या नवीन किमतीबद्दल जाणून घेऊयात.
नवीन जीएसटी सुधारणा अंतर्गत 350cc पेक्षा कमी क्षमतेच्या बाईक्सवर आता फक्त 18% कर आकारला जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आयकॉनिक ठरलेल्या जावा व येझदी बाईक्सना पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रियता मिळत आहे. क्लासिक लिजेंड्स आपल्या ग्राहकांना या करकपातीचा 100% लाभ देत आहे.
जावा-येझदी बाईक 293cc व 334cc क्षमतेच्या अल्फा2 लिक्विड-कूल्ड इंजिनसह येतात, ज्यातून 29PS पॉवर आणि 30Nm टॉर्क निर्माण होतो. या परफॉर्मन्समुळे त्या आपल्या सेगमेंटमधील इतर बाईक्सना मागे टाकतात.
भारतभरातील 450 हून अधिक विक्री आणि सर्व्हिस केंद्रांवर विक्रीनंतरची सेवा आणि सर्वसमावेशक योजना उपलब्ध आहेत. 4 वर्षे/50,000 किमी मानक वॉरंटी, विस्तारित कव्हरेज पर्याय आणि मेंटेनन्स योजनांमुळे ग्राहकांना अभूतपूर्व मानसिक शांती मिळते. GST 2.0 मुळे मालकी हक्काचा खर्चदेखील कमी झाला आहे.
क्लासिक लिजेंड्सने जावा-येझदी परफॉर्मन्स क्लासिक मोटारसायकलींसाठी नवी किंमत जाहीर केली आहे. रोडस्टर, ॲडव्हेंचर, बॉबर ते स्क्रॅम्बलरपर्यंत बहुतेक मॉडेल्स आता 2 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.
दहा वर्षांपूर्वी 2-स्ट्रोक इंजिन बंदीनंतर भारतातील जावा व येझदी ब्रँडला अडथळा आला होता. मात्र आता जीएसटी 2.0 सुधारणेमुळे या मोटारसायकली पुन्हा एकदा भारतीय मोटरसायकल संस्कृतीच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
जावा-येझदी मोटरसायकल्सचे उपाध्यक्ष अनुपम थारेजा म्हणाले की सरकारच्या धाडसी आणि वेळेवर केलेल्या जीएसटी सुधारणांमुळे मोठे निर्णायक बदल घडणार आहे. 350cc पेक्षा कमी मोटारसायकलींसाठी 18% दर आमच्या 293cc आणि 334cc परफॉर्मन्स क्लासिक्सना थेट लागू होतो. जरी आमच्या 652cc BSA Gold Star सारख्या हाय-कॅपॅसिटी बाईक्ससाठी कराचा दर वाढला असला तरी, आम्ही त्याला प्रगतीशील कररचनेचा भाग म्हणून स्वीकारतो. आजचा हा बदल मध्यम श्रेणीतील बाइक्स अधिक लोकांपर्यंत पोहोचवणार आहे.”
कार खरेदीदारांचे सुगीचे दिवस आले! GST 2.0 मुळे Maruti पासून Toyota पर्यंतच्या ‘या’ कार झाल्या स्वस्त
युवा पिढीची स्वप्नातील रेट्रो परफॉर्मन्स बाईक आता अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहे. जागतिक दर्जाचे अभियांत्रिकी, सेगमेंट-बस्टिंग डिझाईन आणि भारतीय रस्त्यांसाठी योग्य तंत्रज्ञानासह जावा-येझदी बाइक्स हाय-फॅशन रेट्रो अनुभव देतात.
याशिवाय, ‘जावा-येझदी BSA ओनरशिप अॅश्युरन्स प्रोग्राम’ अंतर्गत ग्राहकांना 4 वर्षांची मानक वॉरंटी, रोड साईड सहाय्य आणि विस्तारित कव्हरेज मिळते. त्यामुळे मालकी हक्काची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे आणि मेंटेनन्स सहज उपलब्ध झाला आहे.