फोटो सौजन्य: iStock
फक्त देशातच नव्हे तर जगभरात अनेक इलेक्ट्रिक कार्स लाँच होत आहे. भारतात सुद्धा इलेक्ट्रिक कार्सची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. वाढत्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किंमतीमुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार्सना पहिले प्राधान्य देत आहे.
येणार काळ हा इलेक्ट्रिक कार्सचा असणार आहे आहे, त्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. तसेच फुल्ल चार्जिंगमध्ये जास्तीतजास्त रेंज देण्याचा प्रयत्न प्रत्येक कंपनी करताना दिसत आहे.
तुम्हीही पेट्रोल डिझेल कार चालवण्याऐवजी नवीन तंत्रज्ञान आणि उत्तम फीचर्स असणारी इलेक्ट्रिक कार आणि एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तरही बातमी तुमच्यासाठीच आहे. अनेकांना इलेक्ट्रिक कार वापरणे योग्य ठरेल की नाही याची काळजी वाटत असते. याचे कारण म्हणजे अनेकांना वाटते की ही इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना धोका उद्भवू शकतो.
हे देखील वाचा: Maruti Suzuki च्या अनेक कार्सवर आकर्षित सूट, जाणून घ्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट
काही काळापूर्वी जगभरात फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या कार्स वापरल्या जात होत्या. यानंतर सीएनजी तंत्रज्ञान असलेल्या कारचा ट्रेंड खूप वेगाने वाढला पण फार कमी वेळात लोकांना इलेक्ट्रिक कार आणि एसयूव्ही देखील लोकांना आवडू लागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल कारमध्ये इंधन भरणे अगदी सोपे असते. परंतु सुरुवातीला इलेक्ट्रिक कार चार्ज करणे अवघड असते.
कोणतीही कंपनी जेव्हा इलेक्ट्रिक कार लाँच करते तेव्हा त्याच्या आधी अनेक प्रकारचे टेस्टिंग केले जातात. जर कार टेस्टिंगचे वेगवेगळे टप्पे कोणत्याही अडचणीशिवाय पार करत असेल, तरच कार बाजारात दाखल केली जाते.
इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जर आणि कनेक्टर सर्व प्रकारच्या हवामानात कोणत्याही समस्याशिवाय काम करण्यासाठी वाहन उत्पादकांनी बनवले आहेत. यासोबतच त्यांचा दर्जाही चांगला ठेवला जातो. ईव्ही चार्जर आणि कनेक्टर पूर्णपणे वॉटरप्रूफ असतात आणि यासोबतच त्यांना धूळ, माती किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कणांपासून वाचवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरले जाते.
हे देखील वाचा: Hyundai च्या ‘या’ कार्सवर मिळत आहे तब्बल 2 लाख रुपये बचत करण्याची संधी
तुम्ही तुमची कार चार्ज करण्याच्या तयारीत असाल तर लक्षात ठेवा की कार चालवल्यानंतर लगेच तिला चार्जिंगला लावू नका. कारण कार चालवल्यामुळे तिच्या बॅटरीचे तापमान आधीच वाढले असते. अशावेळी जर कारला चार्जिंग करण्यास ठेवले तर त्याचे तापमान आणखी वाढू शकते.
यासोबतच पावसाळा असेल तर कार पार्क करून चार्जरवर पाण्याचे थेट थेंब पडणार नाहीत अशा ठिकाणी चार्ज करण्याचा प्रयत्न करा. यासाठी कव्हर्ड पार्किंग लॉटमध्ये पार्किंग केल्यानंतर कार चार्ज करता येते. अशाप्रकारे, चार्जिंगद्वारे अपघाताची थोडीशी शक्यता देखील टाळली जाऊ शकते.