फोटो सौजन्य: @volklub (X.com)
भारतीय ऑटो बाजारात वाढत्या कार्सच्या मागणीमुळे अनेक कार उत्पादक कंपन्या देशात दमदार कार ऑफर करत असतात. यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणजे किया मोटर्स. भारतीय ऑटो बाजारपेठेत कियाच्या कार्सना खूप पसंती मिळत आहे. कंपनी देखील ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकेनुसार विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात.
आता किया मोटर्स लवकरच त्यांची नवीन कार लाँच करण्याची तयारी करत आहे. लवकरच कंपनी किआ कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही लाँच करू शकते. ही कार 15 जुलै रोजी लाँच होण्याची अपेक्षा आहे. या कारमध्ये तुम्हाला मजबूत रेंज आणि उत्तम फीचर्स मिळणार आहेत. चला या कारबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Kia Carens Clavis चे इलेक्ट्रिक व्हर्जन येत्या 15 जुलै 2025 रोजी लाँच केली जाऊ शकते. परंतु, कंपनीकडून अद्याप कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही. माहितीनुसार, कियाची ही नवीन इलेक्ट्रिक एमपीव्ही दोन बॅटरी पर्यायांसह आणली जाऊ शकते. त्यात 42 किलोवॅट प्रति तास क्षमतेचे आणि 51 किलोवॅट प्रति तास क्षमतेचे बॅटरी पर्याय दिले जाऊ शकतात. या दोन्ही बॅटरी पॅकसह, ही कार एका चार्जमध्ये 400 ते 500 किलोमीटरची रेंज मिळवू शकते.
या 7-सीटर इलेक्ट्रिक MPV ची एक्स-शोरूम किंमत 15 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. या कारच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 20 लाख रुपये असू शकते. Kia Carens Clavis EV ही इलेक्ट्रिक बजेट MPV म्हणून ऑफर केली जाईल.
कंपनी तीन पॉवरफुल इंजिन पर्यायांसह Kia Carens Clavis लाँच करणार आहे. यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 160 पीएस पॉवर आणि 253 एनएम टॉर्क देते, जे 7-स्पीड डीसीटी आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. याशिवाय, 1.5 लीटर डिझेल इंजिन 116 पीएस आणि 250 एनएमसह येते.
या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहेत. त्याच वेळी, 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 115 पीएस आणि 144 एनएम आउटपुट देते, जे iMT (इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन) आणि मॅन्युअल दोन्ही पर्यायांसह दिले जाते. आयएमटीच्या मदतीने, कार ड्रायव्हरला क्लचलेस ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो.