फोटो सौजन्य: Pinterest
जर तुम्ही बजेट-फ्रेंडली, स्पोर्टी राईड शोधत असलेले बाईक प्रेमी असाल, तर बजाज पल्सर 125 हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. पल्सर कुटुंबातील हे एंट्री-लेव्हल मॉडेल त्याच्या परवडणाऱ्या किमती, उत्कृष्ट मायलेज आणि पॉवरफुल कामगिरीसाठी लोकप्रिय आहे. पल्सर 125 विशेषतः पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या आणि शहरातील प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय आहे.
Maruti Brezza Vs Nissan Magnite: कोणत्या कारमध्ये किती दम? जाणून घ्या फीचर्स, इंजिन आणि किंमत?
बजाज पल्सर 125 ची एक्स-शोरूम किंमत 79,048 रुपयांपासून सुरू होते आणि व्हेरिएंटनुसार (निऑन ड्रम, निऑन डिस्क आणि कार्बन डिस्क स्प्लिट) 87,527 पर्यंत जाते. जर तुम्ही दिल्लीमध्ये बेस मॉडेल खरेदी केले तर ऑन-रोड किंमत सुमारे 97,731 रुपये असेल. यामध्ये आरटीओ, विमा आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत.
जर तुम्ही Bajaj Pulsar 125 चा बेस Neon Single Seat व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर किमान 5000 रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. यानंतर उर्वरित 92,731 रुपयांची रक्कम बाईक लोनच्या स्वरूपात घ्यावी लागेल. जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असल्यास तुम्ही हे लोन 10 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी घेतले, तर तुमचा दरमहा EMI सुमारे 3,349 रुपये असेल.
या बाईकमध्ये 124.4cc एअर-कूल्ड DTS-i इंजिन देण्यात आले आहे, जे 11.8 PS पॉवर आणि 10.8 Nm टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड गियरबॉक्ससह हे इंजिन स्मूथ एक्सेलरेशन देते, जे शहरातील ट्रॅफिकपासून ते हायवे राइड्सपर्यंत सहज उपयुक्त ठरते.
ही बाईक BS6 फेज 2 कंप्लायंट असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. तसेच याची टॉप स्पीड 99 kmph पर्यंत जाऊ शकते. Pulsar 125 चे इंजिन तरुण रायडर्सना उत्साह देणारे असून, कमी पेट्रोल खर्चात चांगला परफॉर्मन्स देण्यास सक्षम आहे.
बजाज पल्सर 125 चे सरासरी मायलेज 50-51.46 किमी प्रति लिटर आहे. 11.5 लिटर इंधन टाकीसह, ती एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 500 किमी पेक्षा जास्त मायलेज देते. शहरात 45-48 किमी प्रति लिटर आणि महामार्गावर 52 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज सहज साध्य करता येते.






