किया इंडियाकडून प्लांट रिमोट ओटीए लाँच
मुंबई : ग्राहकांच्या एकूण मालकीहक्क अनुभवाला उत्साहित करण्यासाठी कनेक्टेड आणि सर्वोत्तम गतीशीलता देण्याच्या आपल्या दृष्टिकोनाशी बांधील राहत किया इंडियाने आज उद्योगातील प्रथम प्लांट रिमोट ओव्हर-द-एअर (ओटीए) वैशिष्ट्याच्या लाँचची घोषणा केली.
प्लांट रिमोट ओटीए कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपीट (सीसीएनसी) प्लॅटफॉर्म असलेल्या किया इंडियाच्या नवीन मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल. हे आघाडीचे वैशिष्ट्य खात्री देते की, प्रत्येक कनेक्टेड किया वेईकलमध्ये प्लांटमधून बाहेर पडण्यापूर्वी आधुनिक सॉफ्टवेअरची भर करण्यात आलेली असेल, ज्यासह ग्राहकांना डिलिव्हरी घेताच अपग्रेडेड आणि रेडी-टू-ड्राइव्ह अनुभव मिळेल.
किया इंडियाच्या सेल्स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, ”लाँच करण्यात आलेल्या प्लांट रिमोट ओटीए वैशिष्ट्यासह ग्राहकांचा प्रवास उत्साहित करणाऱ्या नाविन्यतेला चालना देण्याप्रती कियाची समर्पितता अधिक दृढ झाली आहे. प्रत्येक वेईकल आधुनिक सॉफ्टवेअरसह प्लांटमधून बाहेर पडण्याची खात्री घेत आम्ही मालकीहक्क अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जात अधिक विनासायास, सर्वोत्तम आणि भविष्याकरिता सुसज्ज सुविधा देत आहोत. हा महत्त्वपूर्ण टप्पा कनेक्टेड गतीशीलतेच्या आमच्या दृष्टिकोनाला मजबूत करतो, तसेच त्यामधून अत्याधुनिक तंत्रज्ञान व अर्थपूर्ण नाविन्यता सादर करत प्रेरणादायी चळवळीप्रती कियाची कटिबद्धता दिसून येते.” मॅन्युअल हस्तक्षेप किंवा डिलरशिपला भेट देण्याची गरज कमी करत हा उपक्रम ग्राहकांना वेईकल डिलिव्हरी मिळताच कनेक्टेड सेवा व वैशिष्ट्यांची परिपूर्ण श्रेणी त्वरित मिळण्यास सक्षम करेल.
कनेक्टेड कार सिस्टम २.० (सीसीएस २.०) शी सुसंगत असलेल्या कंट्रोलर ओटीए कार्यक्षमतेचा फायदा घेत ही सुधारणा तंत्रज्ञान-संचालित गतीशीलता सोल्यूशन्समधील किया इंडियाच्या नेतृत्वाला दृढ करते. प्लांट ओटीए सर्व भावी कनेक्टेड मॉडेल्समध्ये देखील सादर करण्यात येईल, ज्यासह वेळेवर सादर करण्यात आलेली वैशिष्ट्ये आणि सुरक्षितता अपडेट्सच्या माध्यमातून उत्पादन व डिलिव्हरीमधील तफावत दूर होईल, तसेच ग्राहक समाधान व मालकीहक्क अनुभव अधिक उत्साहित होईल.”
मॅन्युअल हस्तक्षेप किंवा डीलरशिप भेटींची आवश्यकता कमी करून हा उपक्रम ग्राहकांना वाहन डिलिव्हरी मिळाल्यावर कनेक्टेड सेवा आणि वैशिष्ट्यांचा संपूर्ण संच त्वरित प्रवेश करण्यास सक्षम करेल असेही कंपनीने यावेळी म्हटले आहे.कनेक्टेड कार सिस्टम 2.0 (CCS 2.0) सुसंगत कंट्रोलर ओटीए कार्यक्षमतेचा वापर करून मोबिलिटी सोल्यूशन्स किआ इंडियाने बाजारात आणले. प्लांट ओटीए भविष्यातील सर्व कनेक्टेड मॉडेल्समध्ये देखील सादर केले जाईल वेळेवर वैशिष्ट्ये आणि सुरक्षा अपडेट्सद्वारे उत्पादन आणि वितरणातील अंतर भरून काढेल असे कियाने स्पष्ट केले.






