फोटो सौजन्य; X.com
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. पूर्वी फक्त बाईकला चांगली मिळत होती. मात्र, आता मार्केटमध्ये काही बाईकसारख्या लूक असणाऱ्या स्कूटर लाँच होताना दिसत आहे. नुकतेच एका कंपनी अशीच एक ई स्कूटर लाँच केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीला नवीन आकार देणाऱ्या Numeros Motors ने बेंगळुरूमध्ये त्यांची नवीन आणि अनोखी इलेक्ट्रिक टू-व्हीलर, ‘n – First’ लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही ईव्ही बाईक किंवा स्कूटर नाही, तर त्या दोघांचे एक शक्तिशाली कॉम्बिनेशन आहे. चला याचे फीचर्स जाणून घेऊयात.
‘एन-फर्स्ट’ ची किंमत 64,999 (एक्स-शोरूम) रुपये आहे, जी पहिल्या 1000 ग्राहकांसाठी एक इंट्रोडक्टरी ऑफर आहे. ही विशेषतः शहरातील तरुण आणि महिलांसाठी डिझाइन केलेली आहे ज्यांना सर्वोत्तम शैली, आराम आणि परवडणारी क्षमता हवी आहे.
न्यूमेरोस मोटर्सचे संस्थापक आणि सीईओ श्रेयस शिबुलाल यांनी लाँचच्या वेळी सांगितले की, हे केवळ एक वाहन नाही तर एक व्हिजन आहे. प्रत्येक भारतीयाला विश्वासार्ह, परवडणारी आणि स्टायलिश इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
‘n-First’ हा मॉडेल इटलीच्या Wheelab या डिझाइन कंपनीच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे यात आंतरराष्ट्रीय लुक आणि भारतीय मजबुती यांचा उत्तम मेळ पाहायला मिळतो. ही स्कूटर 5 व्हेरिएंट्स आणि ट्रॅफिक रेड व प्युअर व्हाइट या दोन रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे.
याच्या टॉप व्हेरिएंट (3kWh i-Max+) मध्ये 109 किमी (IDC) इतकी रेंज मिळते. तर 2.5kWh व्हेरिएंट्स (Max आणि i-Max) सुमारे 91 किमी रेंज देतात. यात PMSM मिड-ड्राइव्ह मोटर आणि चेन ट्रान्समिशन देण्यात आले आहे, ज्यामुळे स्मूद ॲक्सेलेरेशन आणि उच्च कार्यक्षमता मिळते.
देशातील 5 सर्वात स्वस्त बाईक कोणत्या? किंमत 55 हजारांपासून सुरु
या स्कूटरमध्ये 16-इंचांचे व्हील्स दिले आहेत, जे नियमित स्कूटरपेक्षा अधिक स्थिरता आणि कंट्रोल देतात. राजस्थानच्या उष्णतेपासून हिमाचलच्या थंडीतपर्यंत, सर्व प्रकारच्या रस्त्यांवर या मॉडेलची टेस्टिंग घेण्यात आली आहे.
स्कूटरमध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी (IoT) फीचर्स दिले आहेत. यात ॲप-बेस्ड सिक्युरिटी सिस्टम मिळते, ज्यामध्ये थेफ्ट अलर्ट, टो डिटेक्शन, रिमोट लॉकिंग, जिओ-फेन्सिंग, लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग आणि असे अनेक हाय-टेक फीचर्स मिळतात. तसेच OTA अपडेट्स चा सपोर्टही उपलब्ध आहे.






