MG ZS EV च्या बेस व्हेरिएंटवर 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल EMI?
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत. ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे MG Motors. या कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये उत्तम कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे MG ZS EV. ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात चांगलीच लोकप्रिय आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊयात, 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर या कारचा EMI किती असेल?
MG Motors कडून ZS EV चा बेस व्हेरिएंट 17.99 लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये ही कार खरेदी केल्यास याची ऑन-रोड किंमत सुमारे 18.92 लाख इतकी येते. या किंमतीत 17.99 लाख रुपये एक्स-शोरूम, जवळपास 75,000 RTO शुल्क, आणि सुमारे 18,000 रुपयांचा इन्शुरन्स यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण ऑन-रोड किंमत 18.92 लाख रुपयांइतकी होईल.
Shankar Mahadevan ने खरेदी केली 69.90 लाख रुपयांची ‘ही’ आलिशान कार, फीचर्स तर एकदमच भारी
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केले जाईल. अशा स्थितीत 2 लाख डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 16.92 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी ₹16.92 लाख फाइनान्स करत असेल, तर तुम्हाला दरमहा सुमारे ₹27,226 EMI भरावी लागेल.
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 16.92 लाख रुपयांचे कर्ज घेतले, तर 7 वर्षांच्या कालावधीत तुम्हाला दरमहा 27,226 रुपयांचा EMI भरावी लागेल. या काळात तुम्ही एकूण 5.94 लाख रुपये इतके व्याज म्हणून भराल. त्यामुळे MG ZS EV ची एकूण किंमत सुमारे 24.86 लाख रुपये होईल.
Hyundai Venue ची नवीन जनरेशन तुमच्यासाठी किती सुरक्षित असेल? लाँच आधीच मिळाली ‘ही’ माहिती
JSW MG कडून ZS EV ही एक इलेक्ट्रिक SUV म्हणून सादर करण्यात आली आहे. बाजारात या कारची थेट स्पर्धा Tata Curvv EV, Mahindra BE6, आणि Hyundai Creta Electric यांसारख्या इलेक्ट्रिक SUV मॉडेल्सशी होते.






