फोटो सौजन्य: Gemini
Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता
Hyundai Verna चा सध्याचा मॉडेल 2023 मध्ये सादर करण्यात आला होता. आता 2026 मध्ये त्याचा फेसलिफ्ट येण्याची शक्यता आहे. नव्या वर्नामध्ये पुढील आणि मागील भागात बदल करण्यात येणार असून, नवी ग्रिल, अपडेटेड हेडलॅम्प्स आणि नवे टेललॅम्प्स मिळू शकतात. केबिनमध्ये मोठी स्क्रीन आणि अधिक प्रीमियम लूक अपेक्षित आहे. फीचर्सच्या बाबतीत अॅडव्हान्स सेफ्टी सिस्टीम्स आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखे पर्याय मिळू शकतात. मात्र, इंजिन ऑप्शन्स पूर्वीप्रमाणेच ठेवले जाण्याची शक्यता आहे.
Honda City ही भारतीय ग्राहकांची एक विश्वासार्ह सेडान म्हणून ओळखली जाते. 2026 मध्ये येणारा फेसलिफ्ट हा सध्याच्या जनरेशनचा शेवटचा मोठा अपडेट ठरू शकतो. या फेसलिफ्टमध्ये एक्सटिरिअर डिझाइन अधिक आकर्षक करण्यात येईल, तर केबिनमध्ये सुधारित आणि प्रीमियम इंटिरिअर मिळण्याची अपेक्षा आहे. पेट्रोल आणि हायब्रिड इंजिनचे पर्याय कायम ठेवले जातील. उत्तम मायलेज आणि स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव ही City ची ओळख पुढेही कायम राहणार आहे.
Skoda Slavia ला देखील 2026 मध्ये नवा अवतार मिळणार आहे. कारच्या लुकमध्ये हलके बदल करण्यात येतील आणि काही नवे फीचर्स जोडले जातील. यावेळी कंपनीकडून सेफ्टी फीचर्सवर विशेष भर दिला जाऊ शकतो. केबिनमध्येही काही प्रमाणात अपडेट करण्यात येणार आहेत. इंजिनच्या बाबतीत टर्बो पेट्रोल पर्याय कायम ठेवले जातील, जे परफॉर्मन्स प्रेमींना विशेष पसंत आहेत.
Volkswagen Virtus ही या सेगमेंटमधील एक मजबूत आणि विश्वासू सेडान मानली जाते. 2026 मध्ये येणाऱ्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अधिक फ्रेश डिझाइन आणि अतिरिक्त फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे. सुधारित सेफ्टी आणि अधिक आरामदायक इंटीरियर या कारला आणखी खास बनवतील. इंजिन पर्यायांमध्ये बदल न होता, पूर्वीप्रमाणेच उत्तम परफॉर्मन्स देणारे इंजिन्स कायम ठेवले जाणार आहेत.






