• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maharashtra Aggregator Rules 2025 Ola Uber Fare Control

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी ‘ॲग्रीगेटर नियम २०२५’ लागू, भाड्याचे दर आणि सेवा निश्चित

नव्या नियमांमुळे ॲग्रीगेटर कंपन्या, चालक आणि प्रवासी यांच्यातील संबंध अधिक पारदर्शक होतील तसेच भाडे, सेवा गुणवत्ता, चालकांचे हक्क आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 10, 2025 | 09:05 PM
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी 'ॲग्रीगेटर नियम २०२५' लागू (Photo Credit- X)

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी 'ॲग्रीगेटर नियम २०२५' लागू (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
  • ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी ‘ॲग्रीगेटर नियम २०२५’ लागू
  • भाड्याचे दर आणि सेवा निश्चित

मुंबई: (१० ऑक्टोबर २०२५) — राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५” या मसुदा नियमांची घोषणा केली आहे. हे नियम मोटर वाहन कायदा, १९८८ च्या कलम ७३, ७४ आणि ९३ अंतर्गत प्रस्तावित असून, १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या हरकती व सूचना मागविण्या आल्या असून त्यानंतर लागू होईल. अशी माहिती परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नव्या नियमांमुळे ॲग्रीगेटर कंपन्या, चालक आणि प्रवासी यांच्यातील संबंध अधिक पारदर्शक होतील तसेच भाडे, सेवा गुणवत्ता, चालकांचे हक्क आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.

१. नियमांची लागूता

हे नियम ई-रिक्षासह सर्व प्रवासी मोटार वाहनांच्या ॲग्रीगेटरना लागू होतील. म्हणजेच, ओला-उबर सारख्या कॅब सेवांसोबत ई-रिक्षा सेवा देखील या चौकटीत येतील. तसेच, बाईक-टॅक्सी सेवांसाठी स्वतंत्र “महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५” लागू राहतील आणि त्यासाठी वेगळा परवाना घ्यावा लागेल.

२. परवाना शुल्क आणि सुरक्षा ठेव

राज्य परिवहन प्राधिकरण (STA) व प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) यांच्याकडून परवाना घेताना खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागेल:

तपशील राज्य परिवहन प्राधिकरण (STA) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) (प्रति जिल्हा)

परवाना देणे ₹१०,००,००० ₹२,००,०००
परवाना नूतनीकरण ₹२५,००० ₹५,०००

याशिवाय ॲग्रीगेटरला वाहनसंख्येप्रमाणे सुरक्षा ठेव करावी लागेल.

वाहनांची संख्या सुरक्षा ठेव (₹)

१०० बस किंवा १००० वाहनांपर्यंत १० लाख
१००० बस किंवा १०,००० वाहनांपर्यंत २५ लाख
१००० हून अधिक बस किंवा १०,००० हून अधिक वाहनं ५० लाख

Pratap Sarnaik : अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे ‘ ट्रेड प्रमाणपत्र ‘ रद्द, परिवहन विभागाचा निर्णय

३. भाड्याचे नियमन

सर्ज प्राइसिंग (Surge Model): मागणी वाढल्यास ॲप भाडे वाढवू शकेल, परंतु ते प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवलेल्या मूळ भाड्याच्या १.५ पटांपेक्षा जास्त नसावे.
मागणी कमी झाल्यासही भाडे मूळ दराच्या २५% पेक्षा कमी ठेवता येणार नाही.

सुविधा शुल्क (Convenience Fee): राइडरकडून आकारले जाणारे सुविधा शुल्क मूळ भाड्याच्या ५% पेक्षा जास्त नसावे, आणि एकूण कपात मूळ भाड्याच्या १०% पेक्षा अधिक नसावी.

४. चालक आणि वाहनांवरील अटी

कामाचे तास: चालक एका दिवशी जास्तीत जास्त १२ तास ॲपवर लॉग-इन राहू शकतो. त्यानंतर किमान १० तासांची विश्रांती घ्यावी लागेल.

प्रशिक्षण: ॲग्रीगेटरकडे जोडण्यापूर्वी चालकांना ३० तासांचा प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागेल.

रेटिंग व्यवस्था: चालकाचे सरासरी रेटिंग पाचपैकी दोन स्टार्सपेक्षा कमी असल्यास त्याला सुधारात्मक प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तोपर्यंत ॲपवरून काढण्यात येईल.

विमा: प्रवाशांना ५ लाख रुपयांपर्यंतचा प्रवास विमा घेण्याचा पर्याय ॲपमध्ये अनिवार्यपणे उपलब्ध असावा.

वाहनाचे वय: ऑटोरिक्षा व मोटारकॅब — नोंदणीपासून ९ वर्षांपेक्षा जास्त जुन्या नसाव्यात.

बस — ८ वर्षांपेक्षा जुनी नसावी.

५. ॲप आणि वेबसाइटच्या अटी

ॲप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असावे.

चालकाला राइड स्वीकारण्यापूर्वी प्रवाशाचे गंतव्यस्थान दिसणार नाही, असे ॲप डिझाइन असावे.

प्रवाशाला लाइव्ह लोकेशन शेअरिंग व प्रवास स्थिती पाहण्याची सुविधा ॲपवर असावी.

दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा (Accessibility Features) अनिवार्य असतील.

या नियमांमुळे राज्यातील ॲप-आधारित टॅक्सी सेवांमध्ये प्रवाशांचा विश्वास, सुरक्षितता आणि सेवा दर्जा वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच चालकांच्या कामकाजासाठी ठोस मर्यादा व कल्याणकारी तरतुदी लागू होणार असल्याने चालकांचाही शोषणापासून बचाव होईल.

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक-त्रैमासिक पास योजना सुरु, परिवहनमंत्र्यांची माहिती

Web Title: Maharashtra aggregator rules 2025 ola uber fare control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 09:05 PM

Topics:  

  • automobile news
  • Mumbai
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Mumbai News : आता No Traffic Jam ! सी-लिंक, बीकेसी ते विमानतळ मार्गाला जोडणारा नवा भुयारी मार्ग, कुठून कसा असेल मार्ग?
1

Mumbai News : आता No Traffic Jam ! सी-लिंक, बीकेसी ते विमानतळ मार्गाला जोडणारा नवा भुयारी मार्ग, कुठून कसा असेल मार्ग?

Mangal Prabhat Lodha: छट पूजेदरम्यान मेट्रो आणि बससेवा उशिरापर्यंत सुरू; मंत्री लोढांच्या प्रयत्नांना यश
2

Mangal Prabhat Lodha: छट पूजेदरम्यान मेट्रो आणि बससेवा उशिरापर्यंत सुरू; मंत्री लोढांच्या प्रयत्नांना यश

Mumbai News : 3499 वाहने टो,7000 वाहनांना नोटिसा , बेवारस वाहनं 48 तासात उचला अन्यथा…; महापालिकेने काय दिला इशारा?
3

Mumbai News : 3499 वाहने टो,7000 वाहनांना नोटिसा , बेवारस वाहनं 48 तासात उचला अन्यथा…; महापालिकेने काय दिला इशारा?

Mangal Prabhat Lodha: मुंबईत छट पूजेचा उत्साह; मंत्री लोढा अन् अमित साटम घेणार आढावा
4

Mangal Prabhat Lodha: मुंबईत छट पूजेचा उत्साह; मंत्री लोढा अन् अमित साटम घेणार आढावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी ‘ॲग्रीगेटर नियम २०२५’ लागू, भाड्याचे दर आणि सेवा निश्चित

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी ‘ॲग्रीगेटर नियम २०२५’ लागू, भाड्याचे दर आणि सेवा निश्चित

पुढील आठवड्यात ‘या’ 10 स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर! कंपन्यांचे लाभांश, बोनस आणि स्टॉक स्प्लिटचे वेळापत्रक जाहीर

पुढील आठवड्यात ‘या’ 10 स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर! कंपन्यांचे लाभांश, बोनस आणि स्टॉक स्प्लिटचे वेळापत्रक जाहीर

Market This Week: 3 महिन्यांतील सर्वात मोठी तेजी! परदेशी गुंतवणूकदारांना मोठा परतावा, एका आठवड्यात 3.5 लाख कोटींची वाढ

Market This Week: 3 महिन्यांतील सर्वात मोठी तेजी! परदेशी गुंतवणूकदारांना मोठा परतावा, एका आठवड्यात 3.5 लाख कोटींची वाढ

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

भारतात AI-संचालित शिक्षण सुलभ करण्यासाठी बिटसॉम टेस्‍ट फॉर ऑनलाइन प्रोग्राम्‍स लाँच

भारतात AI-संचालित शिक्षण सुलभ करण्यासाठी बिटसॉम टेस्‍ट फॉर ऑनलाइन प्रोग्राम्‍स लाँच

‘मला तुझी बायको दे त्याबदल्यात तुला…’ प्रियकराने ठेवली पतीसमोर धक्कादायक अटक, पाहून व्हाल हैराण, Viral Video

‘मला तुझी बायको दे त्याबदल्यात तुला…’ प्रियकराने ठेवली पतीसमोर धक्कादायक अटक, पाहून व्हाल हैराण, Viral Video

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.