फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये ऑटो कंपन्या विविध सेगमेंटमध्ये कार विकल्या जातात. मात्र, सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटला असते. ग्राहकांमध्ये एसयूव्हीबद्दल असणारी वाढती डिमांड अनेक ऑटो कंपन्यांना उत्तम एसयूव्ही ऑफर करण्यास प्रोत्साहित करत आहे.
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना, अनेक वाहन उत्पादक कंपन्या नवीन कार सादर करत आहे. अशातच आता महिंद्रा कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे. भारतीय बाजारात महिंद्रा आणखी एक इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याची तयारी करत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
60,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर Tata Punch खरेदी केली तर किती असेल EMI?
महिंद्रा लवकरच एक नवीन एसयूव्ही सादर करण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही एसयूव्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर केली जाऊ शकते. नवीन एसयूव्ही सादर करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक नवीन टीझर रिलीज करण्यात आला आहे.
Muscular presence re-defined. Vision.S comes to life this Independence Day at #FREEDOM_NU.#MahindraAuto #MahindraElectricOriginSUVs pic.twitter.com/3r7h9i4m79
— Mahindra Automotive (@Mahindra_Auto) July 2, 2025
महिंद्राने नवीन एसयूव्हीचा पहिला टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. या एसयूव्हीचे नाव Vision S असे ठेवण्यात आले आहे. परंतु अद्याप या कारच्या औपचारिक नावाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अशी अपेक्षा आहे की Mahindra Scorpio N EV या नावाने सादर केली जाऊ शकते.
कंपनीने सोशल मीडियावर टीझरसह माहिती दिली आहे की ही कार 15 ऑगस्ट रोजी Vision S सादर करण्याची तयारी करत आहे. लाँच झाल्यानंतर लवकरच ही कार देखील लाँच केली जाऊ शकते.
2025 च्या सहामाहीत ‘ही’ कार ठरली सुपरहिट ! Elevate आणि Seltos ला सोडले मागे
यापूर्वी सोशल मीडियावर कंपनीने 30 जून रोजी Vision T नावाने एक टीझर देखील रिलीज केला होता. त्यानंतर अशी अपेक्षा होती की महिंद्रा थार ईव्ही येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी सादर केली जाईल. परंतु आता Vision S नावाच्या टीझरच्या रिलीजनंतर, अशी अपेक्षा आहे की आता 15 ऑगस्ट रोजी Vision T आणि Vision S नावाच्या दोन एसयूव्ही सादर केल्या जातील. ज्या महिंद्रा थार ईव्ही आणि महिंद्रा स्कॉर्पिओ ईव्ही असू शकतात.