फोटो सौजन्य: www.hyundai.com
भारतीय बाजारात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यातही सर्वात जास्त मागणी ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही ऑफर करत असतात. यातीलच एक दमदार एसयूव्ही म्हणजे ह्युंदाई क्रेटा.
भारतीय मार्केटमध्ये, इतर कोणत्याही सेगमेंटच्या वाहनांच्या तुलनेत एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांना सर्वाधिक पसंती दिली जाते. ह्युंदाईने देखील या सेगमेंटमध्ये क्रेटा एसयूव्ही विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांमध्ये सुद्धा ही एसयूव्ही लोकप्रिय आहे.
ह्युंदाई क्रेटा ही मिड साइझ एसयूव्ही म्हणून ऑफर केली जाते. कंपनीच्या मते, 2025 च्या पहिल्या सहामाहीत ही एसयूव्ही सर्वाधिक पसंत केली गेली आहे. यासोबतच, या एसयूव्हीने पहिल्या सहामाहीतील तीन महिन्यांत म्हणजेच मार्च, एप्रिल, जूनमध्ये सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही होण्याचा मन मिळवला आहे.
ऑनलाईन कॅब बुक करणाऱ्यांनो लक्ष द्या ! ‘या’ वेळी Ola Uber दुप्पट भाडं आकारणार, सरकारने दिली परवानगी
ह्युंदाई मोटर इंडियाचे सीओओ तरुण गर्ग म्हणाले की, क्रेटा ही केवळ एक कार नाही तर 12 लाखांहून अधिक भारतीय कुटुंबांसाठी एक भावना आहे. गेल्या दशकात, क्रेटा ही भारतातील ह्युंदाईच्या वाढीचा एक मजबूत आधारस्तंभ राहिला आहे. जून 2025 मध्ये सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल बनणे हे भारतीय ग्राहकांनी ब्रँडला दिलेल्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे.
ह्युंदाई क्रेटा एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स ऑफर करते. या एसयूव्हीमध्ये 17 इंच अलॉय व्हील्स, एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, सिक्वेंशियल टर्न इंडिकेटर, शार्क फिन अँटेना, ड्युअल टोन एक्सटीरियर आणि इंटीरियर, लेदर सीट्स, रियर विंडो सनशेड, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल झोन ऑटो एसी, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, वायरलेस फोन चार्जर, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड्स, स्नो, मड अँड सँड ट्रॅक्शन मोड्स, क्रूझ कंट्रोल, कीलेस एंट्री, स्टोरेजसह फ्रंट कन्सोल आर्मरेस्ट, रिमोट इंजिन स्टार्टसह स्मार्ट की, इलेक्ट्रिक टेलगेट रिलीज, रियर एसी व्हेंट्स, रियर वायपर आणि वॉशर, आणि असे अनेक उत्तम फीचर्स उपलब्ध आहेत.
ह्युंदाई क्रेटा विविध पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 11.10 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 20.50 लाख रुपये आहे.
Thinnest Car In The World: बाईकपेक्षाही बारीक कार, पाहून लोक थक्क! म्हणाले कोणी केला ‘कार’नामा
ह्युंदाईची क्रेटा ही मिड साइझ एसयूव्ही म्हणून उपलब्ध आहे. ही एसयूव्ही बाजारात थेट Honda Elevate, Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyryder, Tata Harrier, Mahindra Scorpio, MG Hector सारख्या एसयूव्हींशी स्पर्धा करते.