फोटो सौजन्य: iStock
एसयूव्ही म्हंटलं की अनेकांची पहिली पसंत ही महिंद्राच्या कार्सना असते. कंपनीने मार्केटमध्ये दमदार लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी मागणी पाहता, महिंद्राने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये देखील त्यांच्या दोन एसयूव्ही ऑफर केल्या. आता आगामी नवीन वर्षात देखील कंपनी नवीन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे.
येत्या काळात भारतीय बाजारपेठेत महिंद्रा अँड महिंद्रा अनेक नवीन एसयूव्ही आणण्याची योजना आखत आहे. 2026 पर्यंत, वाहन निर्माता अनेक नवीन एसयूव्ही सादर करेल. यामध्ये अनेक फेसलिफ्ट, पुढील जनरेशनचे मॉडेल आणि इलेक्ट्रिक, हायब्रिड वाहने समाविष्ट आहेत. चला जाणून घेऊयात, कोणत्या नवीन एसयूव्ही ऑफर केल्या आहे.
3 सेकंदापेक्षाही कमी वेळेत 0-100 Kmph ची स्पीड पकडते ‘ही’ कार, परफॉर्मन्सला तर तोडच नाही
महिंद्रा XEV 9e वर आधारित नवीन तीन-रो एसयूव्हीसह त्यांच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही लाइनअपचा विस्तार करण्यास सज्ज आहे. ‘महिंद्रा XEV 7e’ म्हणून ओळखली जाणारी, ही इलेक्ट्रिक कार नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. XEV 7e मध्ये 59kWh आणि 79kWh LFP बॅटरी पर्याय असतील, जे 542 किमी आणि 656 किमीची रेंज देतात. तथापि, 7-सीटर इलेक्ट्रिक कारची ड्रायव्हिंग रेंज थोडी वेगळी असू शकते.
महिंद्रा अँड महिंद्रा आपली येणारी SUV साठी Hybrid आणि Flex-Fuel इंजिन विकसित करत आहे. कंपनीची पहिली हायब्रिड SUV म्हणजे महिंद्रा XUV 3XO असेल, जी पुढील वर्षी बाजारात येण्याची शक्यता आहे. यात 1.2-लीटर, 3-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन हायब्रीड टेक्नॉलॉजी सह मिळू शकते. याच्या डिझाइन, केबिन आणि फीचर्समध्ये फारसे बदल अपेक्षित नाहीत, मात्र हायब्रिड व्हर्जनमध्ये एक्सटीरिअरवर ‘Hybrid’ बॅज आणि काही इंटिरिअर अपडेट्स मिळू शकतात.
नव्या जनरेशनची महिंद्रा बोलेरो 2026 मध्ये अधिकृतपणे लाँच होणार असल्याची पुष्टी झाली आहे. या SUV मध्ये सध्याचे डिझेल इंजिन कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे, मात्र डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे बदल होऊ शकतात. Spy photos नुसार, 2026 बोलेरो आपला सिग्नेचर अपराईट आणि बॉक्सी स्टान्स कायम ठेवणार आहे. यात मोठा अपग्रेड म्हणून पॅनोरॅमिक सनरूफ दिला जाईल. तसेच या SUV मध्ये पूर्णपणे डिजिटल Instrument cluster, Level-2 ADAS आणि अनेक प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.