फोटो सौजन्य: @GoTechOficial/X.com
एलोन मस्कची कंपनी टेस्लाने त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा एक नवीन हाय परफॉर्मन्स व्हर्जन सादर केला आहे. याला टेस्ला मॉडेल वाय परफॉर्मन्स असे नाव देण्यात आले आहे, ज्याला ज्युनिपर अपडेट असेही म्हटले जात आहे. कंपनीच्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये हा नवीन व्हेरिएंट रिअर व्हील ड्राइव्ह आणि लांब पल्ल्याच्या ट्रिम्सच्या वर ठेवण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे सर्वात मोठे फिचर म्हणजे याचा जबरदस्त स्पीड. ही कार 3 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवते.
स्टँडर्ड व्हर्जनच्या तुलनेत Tesla Model Y Performance चे लुक अधिक स्पोर्टी आहे. यात नव्या डिझाइनचे बंपर्स, कार्बन फायबर रियर स्पॉइलर, खास 21-इंच Arachnid 2.0 अलॉय व्हील्स आणि रेड ब्रेक कॅलिपर्स देण्यात आले आहेत. या मॉडेलचे सस्पेन्शन लोअर सेटअपसह तयार केले गेले आहे, ज्यामुळे SUV ला अधिक चांगले एअरोडायनामिक्स मिळतात आणि High-Speed वर स्थिरता टिकवता येते. या सर्व फीचर्समुळे Model Y Performance ही एक परफॉर्मन्स-ओरिएंटेड SUV ठरते.
Tesla ने Model Y Performance च्या इंटिरिअरमध्येही बदल केले आहेत. यात कार्बन फायबर ॲक्सेंट्स, Ultra HD resolution असलेला 16-इंचाचा मोठा infotainment display आणि नव्या इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल फ्रंट सीट्स दिल्या आहेत. या सीट्समध्ये हीटिंग, कूलिंग आणि एक्सटेंडेड थाई सपोर्ट यांसारखे आधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत. Tesla ची मिनिमलिस्ट डिझाइन लँग्वेज या वेळेस अधिक प्रीमियम फील देते.
Tesla Model Y Performance मध्ये ड्युअल-मोटर AWD सेटअप आहे. ते सुमारे 460 बीएचपी पॉवर आणि 751 एनएम टॉर्क जनरेट करते. ही एसयूव्ही 3 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0-100 Km/h स्पीड पकडते. यात अॅडॉप्टिव्ह सस्पेंशन, मजबूत चेसिस एलिमेंट आणि परफॉर्मन्स टायर्स आहेत, जे हाय-स्पीडवर चांगले हँडलिंग सुनिश्चित करतात.
Tesla Model Y Performance ची डिलिव्हरी लवकरच युरोपमध्ये सुरू होईल. त्यानंतर ती अमेरिकेतही लाँच केली जाईल. तथापि, भारतीय बाजारपेठेत तिच्या लाँच तारखेची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. परंतु टेस्लाने मॉडेल वायसह भारतात आपला प्रवास सुरू केला असल्याने, भविष्यात कंपनी भारतीय ग्राहकांसाठी ही परफॉर्मन्स आवृत्ती देखील आणू शकते.