फोटो सौजन्य: @MarutiCelerio (X.com)
पूर्वी कार खरेदी करताना भारतीय ग्राहक त्याच्या किंमतीवर जास्त लक्षकेंद्रित करायचे. पण आज ही स्थिती बदलत आहे. आता कार खरेदी करताना ग्राहक किंमतीसोबतच सुरक्षिततेला सुद्धा प्राधान्य देताना दिसत नाही. हीच ग्राहाकांची मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या आपल्या कारमध्ये अधिक सेफ्टी फीचर्स समाविष्ट करत आहे. तसेच आपल्या कारचे क्रॅश टेस्टिंग देखील करत असतात, ज्यात कारला सेफ्टी स्टार्स मिळतात.
एसयूव्ही सोबतच हॅचबॅक कार देखील भारतात पसंत केल्या जातात. Maruti Celerio ही मारुतीने कमी बजेटची हॅचबॅक कार म्हणून ऑफर केली आहे. आता या कारमधून प्रवास करणे अधिक सुरक्षित झाले आहे. यामध्ये कंपनीने कोणत्या प्रकारची सेफ्टी फीचर्स दिले आहे? या कारची किंमत काय? या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया.
कार खरेदी करण्याची हीच संधी ! JSW MG च्या ‘या’ कार झाल्या दोन लाख रुपयांपर्यंत स्वस्त
हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुतीने ऑफर केलेली मारुती सेलेरियो कार आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे. कंपनीने या कारमध्ये 6 एअरबॅग्ज दिल्या आहेत. अशा परिस्थितीत, आता या कारच्या बेसपासून टॉप व्हेरियंटपर्यंत या एअरबॅग्ज दिल्या जातील.
नवीन वर्षात कंपनीने कार ब्रोशर देखील अपडेट केले आहे. ज्यामध्ये सहा एअरबॅग्जची माहिती देण्यात आली आहे. ब्रोशरनुसार, सेलेरियो आता साइड आणि कर्टन एअरबॅग्ज तसेच ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज सह येते. यासोबतच, आता या कारमधील सर्व सीटसाठी तीन पॉइंट सीट बेल्ट देण्यात आले आहेत.
बाइकप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! कधी नव्हे ‘एवढ्या’ स्वस्त किमतीत मिळतेय Triumph Speed T4
कंपनीने यामध्ये अनेक उत्तम फीचर्ससोबत सेफ्टी फीचर्स देखील दिले आहेत. त्याच्या बेस व्हेरियंटमध्येही, बॉडी कलर बंपर, क्रोम अॅक्सेंटसह फ्रंट ग्रिल, फ्रंट केबिन लॅम्प, सिक्स बॉटल होल्डर्स, मॅन्युअल एसी, पॉवर स्टीअरिंग, इंजिन आयडल स्टार्ट/स्टॉप, अंतर ते रिकामे, गियर शिफ्ट इंडिकेटर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ABS, EBD, ESP, हेडलाइट लेव्हलिंग, फ्रंट डिस्क ब्रेक, इमोबिलायझर, स्पीड अलर्ट सिस्टम, चाइल्ड प्रूफ रियर डोअर लॉक अशी फीचर्स त्यात उपलब्ध आहेत.
मारुती सेलेरियोमध्ये 998 सीसी क्षमतेचे K10C इंजिन देते. ज्यामुळे त्याला 50.4 किलोवॅटची शक्ती आणि 91.1न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. पेट्रोलसोबतच त्यात सीएनजीचा पर्यायही देण्यात आला आहे.
जर तुम्ही 2025 मध्ये मारुती सेलेरियो खरेदी केली तर तुम्हाला 5.64 लाख रुपये द्यावे लागतील. ही एक्स-शोरूम किंमत त्याच्या बेस व्हेरियंट LXI MT साठी आहे. याशिवाय, त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7.37 लाख रुपये आहे.
भारतीय बाजारपेठेत, सेलेरियो हॅचबॅक सेगमेंटमध्ये आणली जाते. या विभागात, ती मारुतीच्या वॅगन आर, एस प्रेसो तसेच रेनॉल्ट क्विड, ह्युंदाई ग्रँड निओस आय१० सारख्या कारशी थेट स्पर्धा करते.