फोटो सौजन्य: @IndiaTriumph (X.com)
भारतात हाय परफॉर्मन्स बाईक्सची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. आज अनेक तरुण मंडळी हाय परफॉर्मन्स बाईक घेण्याच्या स्वप्न बाळगत असतात. या बाईक दिसण्यात तर आकर्षक असतातच पण याव्यतिरिक्त त्या चालवण्यात देखील एक वेगळीच मज्जा असते.
भारतात अनेक दुचकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या हाय परफॉर्मन्स बाईक ऑफर करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे Triumph. ट्रायम्फच्या बाईक्सला देखील भारतात चांगली मागणी असते. नुकतेच कंपनीने आपल्या एका बाईकवर सूट देत तिला कधी नव्हे त्या किमतीत ऑफर केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
जानेवारी 2025 मध्ये Electric Cars ची विक्री सुसाट, ‘या’ कंपनीने विकल्या सर्वात जास्त EV
भारतात स्पोर्ट्स बाईक्सची एक वेगळ्या प्रकारची क्रेझ दिसून येते. जर तुम्ही भारतीय बाजारात उपलब्ध असलेली स्पोर्टी आणि स्टायलिश बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला Triumph Speed T4 या पॉवरफुल बाईकबद्दल जाणून घेणार आहोत. खरंतर, कंपनीने या बाईकवर 18 हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे. सवलतीनंतर, आता तुम्हाला ही बाईक 1 लाख 99 हजार रुपयांना मिळेल.
या ट्रायम्फ बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.17 लाख रुपये होती, त्यानंतर आता त्याची किंमत 18 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
ट्रायम्फ स्पीड T4 बाईकमध्ये अलॉय व्हील्स, गोल हेडलाइट, सिंगल-पीस सीट आणि फ्युएल टॅंक आहे. रंग कलर पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर, स्पीड T4 बाजारात तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे – मेटॅलिक व्हाइट, फँटम ब्लॅक आणि कॉकटेल रेड वाईन. स्पीड T4 चा हँडलबार 827 मिमी आहे. या बाईकमध्ये राईड-बाय-वायर थ्रॉटल, स्लिप अँड असिस्ट क्लच, ड्युअल-चॅनेल एबीएस आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
देशातील सर्वात स्वस्त EV साठी किती करावे डाउन पेमेंट? जाणून घ्या EMI चा सोपा हिशोब
ट्रायम्फ स्पीड T4 मध्ये मजबूत स्टील ट्रेलिस फ्रेम वापरली गेले आहे, ज्यामुळे बाईक अधिक स्थिर आणि नियंत्रणात राहते. यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क सस्पेंशन आणि मोनोशॉक रियर सस्पेंशन आहे. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला डिस्क ब्रेक आहेत.
जर आपण भारतीय बाजारपेठेतील बाईकच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल बोललो तर, Triumph Speed T4 थेट रॉयल एनफील्ड हंटर 350 शी स्पर्धा करते. जर तुम्हाला स्टायलिश, गुळगुळीत आणि आरामदायी राइड हवी असेल तर ही बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.