फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. यातीलच एक मोठे आणि महत्वाचे नाव म्हणजे Maruti Suzuki. मारुतीने देशात नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार उत्तम आणि बजेट फ्रेंडली कार्स ऑफर केल्या आहेत. भले आज मार्केटमध्ये नवीन कार लाँच होत असल्या तरी ग्राहक मारुतीच्या Alto, Wagon R सारख्या कारला पहिले प्राधान्य देते. आता कंपनीने एप्रिल 2025 मध्ये ग्राहकांसाठी दमदार ऑफर्स आणले आहेत.
मारुती सुझुकीने एप्रिल 2025 साठी त्यांच्या एरिना मॉडेल्ससाठी डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या आहेत. एप्रिलमध्ये, मारुती त्यांच्या कारवर 67,100 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट बोनस, विशेष किमतीत अॅक्सेसरीज किट आणि अगदी स्क्रॅपेज किंवा एक्सचेंज बोनस देखील समाविष्ट आहेत.
लक्षात घ्या, मार्च प्रमाणे, एप्रिलमध्येही कंपनी नवीन डिझायर आणि ब्रेझाच्या सीएनजी व्हेरियंटवर कोणतीही सूट देत नाही. चला जाणून घेऊया, एप्रिल 2025 मध्ये मारुती सुझुकी कोणत्या कारवर डिस्काउंट ऑफर देत आहे.
जर तुम्ही मारुती सुझुकी अल्टो के10 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या कारवर ₹40,000 पर्यंतची कॅश डिस्काउंट, ₹25,000 चा स्क्रॅपेज बोनस, आणि ₹2,100 चा कॉर्पोरेट बोनस मिळवा. या कारवर एकूण डिस्काउंट ₹67,100 रुपये आहे.
ही डिस्काउंट ऑफर फक्त अल्टो k10 च्या व्हीएक्सआय प्लस एएमटी व्हेरियंटवर उपलब्ध आहे.
VXI (O) AMT व्हेरियंटवर कोणतीही सूट नाही.
यावर 25,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस किंवा 15,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे.
अल्टो k10 च्या मॅन्युअल आणि सीएनजी व्हेरियंटवर एकूण 62,100 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
भारतीय बाजारात अल्टो K10 ची किंमत 4.23 लाख ते 6.20 लाख रुपयांपर्यंत आहे.
मारुती एस-प्रेसोवर सुद्धा चांगली ऑफर मिळत आहे. तुम्ही या कारवर 35,000 पर्यंतची कॅश डिस्काउंट, 25,000 चा स्क्रॅपेज बोनस, आणि 2,100 चा कॉर्पोरेट बोनस मिळवू शकता. या कारवर एकूण मिळणारे डिस्काउंट ₹62,100 आहे.
या कारच्या AMT व्हेरियंटवर सूट दिली जात आहे. त्याच्या मॅन्युअल आणि सीएनजी व्हेरियंटवर कमी कॅश डिस्काउंट उपलब्ध आहे. त्यावर उपलब्ध असलेले कॉर्पोरेट डिस्काउंट आणि स्क्रॅपेज बोनस सर्व व्हेरियंटमध्ये सारखेच आहेत.
एप्रिल 2025 मध्ये एस-प्रेसोवर एकूण 57,100 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. एस-प्रेसोची किंमत (एक्स-शोरूम) 4.26 लाख ते 6.11 लाख रुपयांपर्यंत आहे.
मारुती सुझुकी वॅगनआर वर देखील आकर्षक ऑफर मिळत आहे. या कारवर तुम्ही 40,000 पर्यंतचे कॅश डिस्काउंट, 25,000 चा स्क्रॅपेज बोनस, आणि ₹2,100 चा कॉर्पोरेट बोनस मिळवू शकता. या कारवर एकूण मिळणारी सवलत 67,100 पर्यंतची आहे.
या कारच्या AMT व्हेरियंटवर जास्तीत जास्त डिस्काउंट दिले जात आहे. या कारच्या एमटी आणि सीएनजी व्हेरियंटवर 35,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट दिली जात आहे. मारुती वॅगन आरची एक्स-शोरूम किंमत 5.64 लाख ते 7.35 लाख रुपयांपर्यंत आहे.
याव्यतिरिक्त, Celerio, Swift ,Brezza आणि Eeco कारवर देखील कंपनी डिस्काउंट देत आहे.