फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये लक्झरी कार्सच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आजही जेव्हा विषय लक्झरी कारचा येतो, तेव्हा आपसूकच अनेकांना Mercedes चे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. Mercedes ने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. तसेच अनेक राजकारणी आणि सेलिब्रेटी मंडळी देखील आपल्या कार कलेक्शनमध्ये Mercedes च्या कारचा समावेश करत असतात. मात्र, आता कंपनीने आपल्या कारसाठी रिकॉल जारी केला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ इंडियाने त्यांच्या काही लोकप्रिय मॉडेल्ससाठी रिकॉल जारी केले आहे, या यादीत S Class, GLC, SL 55 आणि EQS यांचा समावेश आहे. आगीचा धोका लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे, जेणेकरून कार मालकांची सुरक्षितता सुधारता येईल. मर्सिडीजने या कार्सबद्दल का रिकॉल केल्या आहेत आणि तुम्ही काय करावे याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.
Uber, Rapido आणि Ola टेन्शनमध्ये ! बंगळुरूनंतर महाराष्ट्रात सुद्धा Bike Taxi बॅन होणार?
Mercedes-Benz ला S Class, GLC, SL 55 आणि EQS सेडानमध्ये तांत्रिक दोष आढळला आहे, ज्यामुळे या कार्समध्ये आग लागण्याचा धोका असू शकतो. ही समस्या इंजिन किंवा इलेक्ट्रिकल सिस्टमशी संबंधित आहे. रिकॉल करण्याचा उद्देश या दोषांचे निराकरण करणे आहे.
मर्सिडीज-बेंझच्या या रिकॉल केलेल्या वाहनांमध्ये एस क्लास, जीएलसी, एसएल 55 आणि ईक्यूएस सेडानचा समावेश आहे. S Class व्हीआयपी आणि उत्तम ड्रायव्हिंगसाठी ओळखला जातो. GLC ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. AMG SL 55 ही एक स्पोर्टी आणि परफॉर्मन्स कार आहे. EQS सेडान ही एक इलेक्ट्रिक कार आहे, जी अनेक प्रीमियम फीचर्ससह सुसज्ज आहे.
किती टेपा मारता राव ! Skoda Kylaq चा दावा 19.05kpl मायलेजचा, प्रत्यक्षात मात्र भलताच रिझल्ट आला समोर
कंपनीने ग्राहकांना त्यांच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधून त्यांच्या कारचा VIN (Vehicle Identification Number) तपासण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्यांची कार रिकॉल लिस्टमध्ये आहे की नाही हे कळेल. त्यानंतर, कंपनी त्यांच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरद्वारे प्रभावित कारची तपासणी करण्यात येईल. यानंतर कंपनी हा दोष मोफत दुरुस्त करेल, ज्यामध्ये पार्ट्स बदलणे किंवा सॉफ्टवेअर अपडेट समाविष्ट असू शकते.
तुम्हाला तुमच्या डीलरशी अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला वाहन तपासावे लागेल. तुमच्या कारमध्ये कोणताही असामान्य वास किंवा धूर आढळल्यास, ते ताबडतोब बंद करा आणि सर्व्हिस सेंटरची मदत घ्या. त्याच वेळी, जर तुमची कार रिकॉल लिस्टमध्ये असेल, तर पावसात एसीचा योग्य वापर करा आणि डीफ्रॉस्ट मोड वापरा.