फोटो सौजन्य: @JS4WheelMotors (X.com)
महिंद्रा आता त्यांच्या लोकप्रिय SUV XUV700 चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्याची तयारी करत आहे, ज्याचे नाव XEV 7e असणार आहे. अलीकडेच ही इलेक्ट्रिक SUV भारतातील रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान दिसली. ही कार पूर्णपणे झाकलेली होती, परंतु तरीही यांच्या डिझाइन आणि फीचर्सबद्दल काही मोठी माहिती समोर आली आहे.
टेस्टिंगमधून असे दिसून आले की या SUV च्या पुढील बाजूस बंद ग्रिल आहे. त्यात L-आकाराचे LED DRL लाईट्स आणि उत्तम दिसणारे ड्युअल टोन एरो अलॉय व्हील्स आहेत. तसेच, त्याचे फ्लश डोअर हँडल त्याला फ्यूचरिस्टिक लूक देतात. डिझाइनच्या बाबतीत, ही कार XUV700 सारखीच दिसते, परंतु त्यात छोटे बदल केले गेले आहेत जे महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक SUV कुटुंबात एक वेगळी ओळख देतील.
महिंद्रा XEV 7e चे इंटिरिअर मुख्यत्वे कंपनीच्या हाय-एंड SUV XEV 9e द्वारे प्रेरित असेल. त्यात अशी अनेक प्रगत फीचर्स असतील, जे तिला प्रीमियम लूक आणि फील देतील. या एसयूव्हीला नवीन 2-स्पोक स्टीअरिंग व्हील दिले जाईल, ज्याच्या मध्यभागी एलईडी लोगो असेल. हे स्टीअरिंग केवळ आधुनिक दिसणार नाही तर ड्रायव्हिंग देखील चांगले करेल. याशिवाय, यात तीन भागांचा डॅशबोर्ड असेल, ज्यामध्ये इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एकत्र जोडले जातील.
अख्खं मार्केट आता आपलंय ! Tata च्या ‘या’ कारने June 2025 मध्ये सर्वच ऑटो ब्रँड्सना दिली धोबीपछाड
महिंद्रा XEV 7e कंपनीच्या नवीन INGLO स्केटबोर्ड EV प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. त्यात दोन बॅटरी पर्याय (पहिला 59 kWh बॅटरी पॅक आणि दुसरा 79 kWh) दिले जाण्याची शक्यता आहे. यातील मोठी बॅटरी XEV 7e ला एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 600 किमी पर्यंतची रेंज देऊ शकेल. यासोबतच, त्याला अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल, ज्यामुळे बॅटरी काही वेळात पूर्णपणे चार्ज करता येईल.
परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, ही एसयूव्ही दोन ड्रायव्हिंग कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल: RWD (रीअर व्हील ड्राइव्ह) व्हेरिएंट एकच मोटर दिली जाईल. AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) व्हेरिएंट दोन मोटर्स असतील, ज्या एकत्रितपणे सुमारे 325 bhp ची पॉवर निर्माण करतील. अशाप्रकारे, XEV 7e केवळ लांब अंतर कापण्यास सक्षम नसेल, तर स्पीड आणि पॉवरच्या बाबतीतही ती मजबूत असल्याचे सिद्ध होईल.
Donald Trump च्या टॅरिफचा Nissan ला फटका ! कॅनडात मध्ये बंद करावे लागले 3 मॉडेल्स
महिंद्राने अद्याप अधिकृतपणे XEV 7e च्या लाँचिंग तारखेची घोषणा केलेली नसली तरी, सूत्रांनुसार, 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ही कार सादर केली जाऊ शकते. त्याच वेळी, याचे प्रत्यक्ष लाँचिंग 2025 च्या शेवटच्या महिन्यांत होऊ शकते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ही SUV महिंद्र BE 6 आणि XEV 9e दरम्यान असेल.