नवीन Hyundai Venue दिसली रे!
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी Hyundai Motors. या साऊथ कोरियन कंपनीने भारतासह जगभरात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Hyundai Venue ही भारताची सर्वात लोकप्रिय कार मानली जाते. आता लवकरच कंपनी याचे नवीन व्हर्जन मार्केटमध्ये आणायच्या तयारीत आहे.
भारतातील सर्वात लोकप्रिय सब 4 मीटर एसयूव्हींपैकी एक असलेली ह्युंदाई व्हेन्यू लवकरच नवीन डिझाइन आणि सुधारित फीचर्ससह परत येत आहे. ही नवीन एसयूव्ही 4 नोव्हेंबर 2025 रोजी भारतात लाँच होईल. नवीन ह्युंदाई व्हेन्यूमध्ये कोणते फीचर्स असेल ते जवळून पाहूया.
Tata Motors ने केली टाटा LPO 1822 बस चेसिस लाँच, सर्वात प्रगत इंटरसिटी प्लॅटफॉर्म
नवीन Hyundai Venue ला संपूर्णपणे नव्या डिझाईनमध्ये सादर करण्यात येणार आहे. अलीकडेच या गाडीचा नवीन अवतार टेस्टिंगदरम्यान दिसला आहे. यात 12.3-इंचाचा ड्युअल डिस्प्ले दिला जाणार असून तो वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करेल. त्यामुळे ही Hyundai ची पहिली मुख्य प्रवाहातील SUV ठरणार आहे, ज्यामध्ये नेक्स्ट जनरेशन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध असेल.
याशिवाय, नवीन Hyundai Venue मध्ये फ्यूचरिस्टिक स्टीयरिंग व्हील, 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, आणि रियर व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखे प्रीमियम फीचर्सही पाहायला मिळतील.
दिवाळीत करा स्वप्नपूर्ती! 5 लाखांच्या आत दारात उभी करा नवी कार; ‘हे’ आहेत शानदार पर्याय
ह्युंदाई व्हेन्यूमध्ये लेव्हल-2 ADAS फीचर्स मिळू शकतात. सध्या, ते लेव्हल-1 ADAS देते, परंतु नवीन व्हेन्यू आता लेव्हल-2 ADAS सह येईल. यात ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन वॉच, लेन कीप असिस्ट आणि अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखी प्रगत फीचर्स देईल. याव्यतिरिक्त, ओटीए (ओव्हर-द-एअर) अपडेट्स उपलब्ध असतील, ज्यामुळे तुम्हाला नेहमीच लेटेस्ट फीचर्स आणि अपडेट्स मिळतील. या बदलासह, ह्युंदाईने पुन्हा एकदा सर्वांना सुरक्षितता उपलब्ध करून देण्याचे आपले ध्येय साध्य केले आहे.
2026 Hyundai Venue मध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच इंजिन पर्याय दिले जातील. त्यात 1.2L लिटर 4-सिलेंडर एनए पेट्रोल, 1.0L 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर 4-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. इंजिननुसार, ते 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह दिले जाईल.